घरमनोरंजनतनुश्री दत्ताच्या वक्तव्यावर 'या' पत्रकाराने केला खुलासा!

तनुश्री दत्ताच्या वक्तव्यावर ‘या’ पत्रकाराने केला खुलासा!

Subscribe

बॉलिवूडमधून तनुश्रीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला जात आहे. अभिनेता फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना, स्वरा भास्कर आणि अभिनेत्री रिचा चढ्ढाने तनुश्रीच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर पत्रकार जेनिस सिक्वेरानेही आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तब्बल दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचा धक्कादायकक खुलासा तनुश्रीने मीडियासमोर केला आहे. दहा वर्षांपूर्वी आलेला हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एक गाण्याच्या शूटींग दरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला होता. तसेच त्यावेळी मनसेने आपल्याला धमकावल्याचेही तनुश्रीने सांगितलं होतं. सध्या बॉलिवूडमधून तनुश्रीला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला जात आहे. अभिनेता फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना, स्वरा भास्कर आणि अभिनेत्री रिचा चढ्ढाने तनुश्रीच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

तर पत्रकार जेनिस सिक्वेरानेही आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेनिसने त्यावेळी घडलेला प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर घडला आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. जेनिसच्या या ट्वीटवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली अनुमती दर्शवली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काय होता नेमका आरोप?

मॉडेल, अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत, ‘या अभिनेत्यामुळे आपण बॉलिवूडला रामराम ठोकला होता,’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. २००८ साली तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यासंबंधी तिने पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. तेव्हापासूनच तनुश्रीच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली, असे म्हटले जाते. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका आयटम साँगसाठी तनुश्रीची निवड करण्यात आली होती. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, नाना पाटेकर यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच नानांसोबत इंटिमेट सीन करण्यास आपण नकार दिला होता. त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -