घरमनोरंजनपंतप्रधानांवरील बायोपिक हा कॉमेडी चित्रपट - उर्मिला मातोंडकर

पंतप्रधानांवरील बायोपिक हा कॉमेडी चित्रपट – उर्मिला मातोंडकर

Subscribe

उर्मिला मातोंडकरने प्रचार सभा दरम्यान भाजप आणि मोदींनी विसरलेली आश्वासनं लक्षात आणून दिली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाला होता. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित करत जनतेच्या मनामध्ये चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. दरम्यान, अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर हिने देखील पीएम मोदी चित्रपटावर टीका केली आहे. मोदींचा चित्रपट हा एक थट्टेचा विषय आहे. आतापर्यंत उर्मिला मातोंडकरने प्रचार सभा दरम्यान भाजप आणि मोदींनी विसरलेली आश्वासनं लक्षात आणून दिली आहेत.

मोदींवर कॉमेडी चित्रपट बनवा

मुंबईतील मराठी पत्रकार संघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उर्मिलाने मोदींवर थेट निशाणा साधला आहे. तिने असे म्हटले आहे की, ‘मोदींच्या जीवनावर आधारीत चित्रपट हा काही नसून मोदींवर असलेला थट्टेचा विषय आहे. कारण ५६ इंच छातीचा दावा करणारे दिलेले आश्वासन पूर्ण करुन दाखवण्यात असमर्थ ठरले आहेत. मोदींच्या जीवनावर आधारीत चित्रपट लोकशाही, गरिबी आणि भारताच्या विविधतेची थट्टा करणारा आहे.’ पुढे उर्मिलाने असे देखील म्हटले आहे की, मोदींवर आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या आश्वासनांवर एक कॉमेडी चित्रपट बनवला पाहिजे होता.

- Advertisement -

चित्रपट प्रदर्शनावर आयोगाने घातली बंदी

लोकशाही देशामध्ये यापेक्षा वाईट असून शकत नाही जिथे पंतप्रधान मोदींना देशातील प्रश्नांवर प्रतिक्रिया द्यायला वेळ नाही. कारण ते परदेशात जाऊन बसले. अशा पंतप्रधानांवर चित्रपट निर्मिती करणे म्हणजे हा थट्टेचा विषय आहे. विवेक ओबेरॉय याने या चित्रपटामध्ये मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र निवडणूक आयोगाने या चित्रपटावर निवडणूक काळात प्रदर्शित होण्यावर बंदी घातली आहे.

पोलीस सुरक्षेची मागणी

उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश करुन काही दिवसच झाले आहेत. एवढ्या कमी वेळात उर्मिला राजकीय वातावरणात चांगलीच रमलेली पहायला मिळत आहे. सध्या ती काँग्रेसची एक चांगली नेता म्हणून देखील ओळखली जाते. बोरिवली येथील एका सभे दरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या घटनेनंतर उर्मिलाने पोलिसात तक्रार करुन पोलीस सुरक्षेची मागणी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -