घरमनोरंजनकरदात्यांच्या पैशातून Y+ दर्जाची सुरक्षा का? उर्मिला मातोंडकर कंगनावर भडकली

करदात्यांच्या पैशातून Y+ दर्जाची सुरक्षा का? उर्मिला मातोंडकर कंगनावर भडकली

Subscribe

कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरुन उर्मिला मातोंडकरने व्यक्त केला संताप

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि बॉलिवूड क्विन अभिनेत्री कंगना राणावत यांच्या शाब्दिक ट्विटर वॉर रंगल्याचे दिसत होते. या शाब्दिक युद्धानंतर कंगना मुंबईत ९ सप्टेंबर रोजी येणार असल्याचे कंगनाने स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. मात्र झालेल्या शाब्दिक युद्ध, उत्तर-प्रत्युत्तरामुळे मुंबईत येताना अभिनेत्री कंगनाला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र कंगनाला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यावरुन उर्मिला मातोंडकरने संताप व्यक्त केला आहे.

एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना उर्मिला मातोंडकरने हे वक्तव्य केले असून जनतेच्या पैशातून कंगनाला ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी देण्यात आली अशी विचारणा उर्मिला मातोंडकरने केली आहे. काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणे हे अतिशय आक्षेपार्ह, निंदनीय असल्याची टीकाही तिने केली आहे.

- Advertisement -

करदात्यांच्या पैशातून वाय प्लस दर्जाची सुरक्षा!

यावेळी ती असेही म्हणाली की, “मॅडमना जी वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती त्याचे पैसे कोण देतं…तुमच्या आमच्यासारखा माणूस जो ‘अॅक्ट ऑफ गॉड’ म्हणून टॅक्सपासून पळून जाऊ शकत नाही. तो कसंही करुन टॅक्स भरतो. त्या करदात्यांच्या पैशातून हिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली ती काय म्हणून दिली गेली होती.”


केंद्राने सांगितलं, कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचं खरं कारण

आमच्या पैशांवर ही सुरक्षा कशासाठी

यावेळी संतप्त विचारणा करत उर्मिला पुढे असेही म्हणाली, “माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा तिने माझ्याकडे माफियांची नावं असून ती अमली पदार्थ विभागाला द्यायची असल्याचा दावा केला होता. सर्वात प्रथम म्हणजे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुंबईसारख्या भयाण ठिकाणी तू न येता पण ते देऊ शकली असतीस. इंटरनेटवर, मेल, फोनवरुन नावं देऊ शकत होती. पण आलीस कशाला ? चिथवायला. बरं नावं दिल्यावर काय झालं ? मग आमच्या पैशांवर ही सुरक्षा कशासाठी देण्यात आली होती.”

- Advertisement -

कंगनावर बोलणंच गरजेचे वाटत नाही

“काही लोकांबद्दल मनात द्वेष आहे म्हणून संपूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे. इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, इंडस्ट्रीने कित्येक जणांना त्यांचं घर, भाकर सगळे काही दिलं आहे. हे जे काही सुरु आहे ते सगळं वाईट आहे. कंगनावर बोलणंच मला गरजेचे वाटत नाही,” असंही ती म्हणाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -