घरमनोरंजनअदिती आर्या दिसणार कबीर खानच्या 'या' चित्रपटात

अदिती आर्या दिसणार कबीर खानच्या ‘या’ चित्रपटात

Subscribe

या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत.

मॉडेलिंगमध्ये पदार्पण करणारी अदिती आर्या २०१५ फेमिना मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड म्हणून ओळखली जाते. लवकरच ‘83’ या बहुचर्चित चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू होणार आहे. अदितीने दाक्षिणात्य सिनेमात तिच्या मोहक उपस्थिती आणि तिच्या अप्रतिम अभिनयासाठी नाव कमावले आहे. आता अदिती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून बहुप्रतिक्षित 83’ चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

“83” चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याबद्दल उत्साहित अदिती म्हणाली,” मला या चित्रपटाचा पहिल्यापासून एक भाग व्हायचं होतं, कारण त्यात भारताला अभिमान वाटणारा ऐतिहासिक क्षण आहे; मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या करीयरच्या सुरवातीलाच मला एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करण्याचे संधी मिळाली, आणि कबीर खान सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होता.

- Advertisement -

या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, साकीब सलीम, बोमन इराणी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत. अदिती हा दक्षिणेकडील उद्योगातील प्रमुख चेहरा आहे त्यांनी “सेव्हन”, “आयएसएम” आणि “कुरुक्षेत्र” सारख्या लोकप्रिय चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तिने दक्षिण चित्रपटातच नाहीतर हिंदी वेब सिरीज “तंत्र” आणि “स्पॉटलाईट” मध्ये सुद्धा काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -