सुशांतवर आधारीत चित्रपटात दिसणार आदित्य ठाकरेंशी साधर्म्य असणारं पात्र!

sushant- aaditya tyhakery
सुशांत - आदित्य ठाकरे

–  १४ जूनला सुशांत सिंग राजपुतने आत्महत्या केल्यानंतर दिवसेंदिवस हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीच होत आहे. दररोज नवनवीन खुलासे या प्रकरणात होत आहेत. एवढचं नाहीतर सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला राजकीय आणि षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचंही सत्र सुरु आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. याचदरम्यान ‘सुसाइट और मर्डर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटात आदित्य ठाकरे यांच्याशी मिळतं- जुळतं पात्रही दिसणार आहे. अभिनेता प्रभव उपाध्याय आदित्य ठाकरे यांच्याशी मिळतं-जुळतं पात्राची भूमिका साकारणार आहे.

पात्रांची नावं बदलली

चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, चित्रपटाचं कथानक आणि पात्रांनुसार कलाकारांची निवड करण्यात आली आहे. कोणत्याही पात्राला खरी नावं देण्यात येणार नाहीत त्याचप्रमाणे राजकीय पात्राचं नावंही बदल्याणात येणार आहेत. प्रभव उपाध्याय साकारत असलेलं पात्र आम्ही कधीच म्हणणार नाही की ते आदित्य ठाकरे यांच्यावर आधारीत आहे.

२५ डिसेंबरला चित्रपटाचा शुभारंभ

विजय शेखर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ‘सुसाइड आणि मर्डर’ या चित्रपटाचा शुभारंभ २५ डिसेंबरला नोएडातील हॉटेल ब्लू रेडिसानमध्ये करण्याचा प्लान केला आहे. तसेच चित्रपटाचं शुटींग ३० सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं पहिलं शेड्यूल ४० दिवसांचं असेल आणि चित्रीकरण ग्रेटर नोएडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या ४ थ्या दिवशी त्याच्या आयुष्यावर आधारीत ‘सुसाइड ऑर मर्डर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूत (सचिन तिवारी), रिया चक्रवर्ती (श्वेता पराशर), करण जोहर (राणा) यांची भूमिका साकारणार आहेत.


हे ही वाचा – घ्या आता रियावर चित्रपट, मुंबईत शुटींगलाही झाली सुरूवात!