घरमनोरंजनमहेश भट्टचे प्रेक्षकांना रिटर्न गिफ्ट; 'सडक २' ची केली घोषणा!

महेश भट्टचे प्रेक्षकांना रिटर्न गिफ्ट; ‘सडक २’ ची केली घोषणा!

Subscribe

निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या वाढदिवसानिमित्त 'सडक २' या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक स्वतः महेश भट्ट करणार आहेत.

हिंदी सिनेसृष्टीतील दर्जेदार कलाकृती सादर करणारे ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट त्यांच्या दिग्दर्शन क्षेत्रात कमबॅक करत आहेत. १९९१ साली आलेल्या सडक चित्रपटाचा सिक्वल घेऊन भट्ट कुटुंबिय प्रेक्षकांच्या भेटीला पहिल्यांदा एकत्रितपणे येत आहेत. आज, २० सप्टेंबर रोजी महेश भट्ट त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत असून या मुहुर्तावर त्यांनी ‘सडक २’ ची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘सडक’ चित्रपटात कलाकार जोडी अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री पूजा भट्ट हे होते. ही जोडी पुन्हा एकदा ‘सडक २’ मधून दिसणार आहे. शिवाय, आजच्या काळातील फ्रेश चेहरे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओमध्ये

गेल्या सात दिवसांपासून पूजा भट्ट आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत आहे. १३ तारखेपासून तिने महेश भट्ट यांचे दुर्मिळ फोटो आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करण्यास सुरूवात केली. आजवर तब्बल ७ वेगवेगळे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अखेर आज पूजाने ‘सडक २’ च्या पोस्टरचा व्हिडिओदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुकेश भट्ट यांची निर्मिती असलेला हा आगामी चित्रपट असून या कलाकृतीच्या माध्यमातून महेश भट्ट पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल २७ वर्षांनंतर या चित्रपटाचा सिक्वल येत असून हा सिनेमा २५ मार्च २०२० साली प्रदर्शीत होणार आहे.

sadak 2
सडक आणि सडक २

निर्माता – दिग्दर्शक महेश भट्ट यांचे दुर्मिळ फोटो 

 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -