घरमनोरंजनमहानायकानंतर 'या' कलाकारचे ट्विटर अकाऊंट हॅक

महानायकानंतर ‘या’ कलाकारचे ट्विटर अकाऊंट हॅक

Subscribe

या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून राज्य सायबर पथक आणि मुंबई सायबर सेलला याबाबतची माहिती देण्यात आली आहे,

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांचे देखील ‘ट्विटर’ खाते हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता, तसेच ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिह्ण्यात आल होतं. हे दोन्ही प्रकरणात एकच हॅकर्स असून त्याच्या लक्ष्यावर बॉलीवुडचे आणखी काही नट नट्या असण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून राज्य सायबर पथक आणि मुंबई सायबर सेलला याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपआयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटलं आहे.

adnam sami tweet

- Advertisement -

बॉलिवूड मधील महानायक अमिताभ बच्चन (बिगबी) यांचे सोमवारी रात्री ‘ट्विटर’ खाते हॅक करण्यात आले होते, त्यांच्या ट्विटर’ हॅण्डलचा प्रोफाइलवरील फोटो बदलण्यात आला होता, त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यांच्या ट्विटर’ हॅण्डलच्या बायोमध्ये ‘लव्ह पाकिस्तान’ असं लिहण्यात आले होते. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्टे शेअर करण्यात आलेल्या आहेत. बिगबी यांचे ट्विटर खाते हॅक कऱण्यात आल्याचे माहिती सोमवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आणखी बॉलिवूड तसेच बिगबी यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती.

- Advertisement -

तुर्कीस्तान मधील ‘टर्किश साइबर आर्मी ‘अयिल्दिज टीम’ने बिग बी यांचं ट्विटर हॅण्डल हॅक केलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ यांचं ट्विटर हॅण्डल रिकव्हरही करण्यात आलं. तसंच हॅकर्सनी केलेले सर्व ट्वीट डिलीट केले आहेत. मात्र या पाठोपाठ सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याचे देखील ट्विटर हॅण्डल खाते हॅक कऱण्यात आले त्याचा प्रोफाइल वरील फोटो बदलून त्यागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणातील हॅकर्स एकच असून त्याच्या लक्ष्यावर बॉलिवूडच्या आणखी काही नट- नट्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दोन्ही प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून गंभीरतेने दखल घेण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून ‘राज्य सायबर सेल’ आणि मुंबईतील सायबर सेलला याची माहिती देण्यात आली असून या प्रकरणाचा तपास कऱण्यात येत असल्याचे मुंबई पोलीसाचे प्रवक्ते पोउआयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -