सात वर्षांनी दिसणार बीग बी आणि अजय देवगण ऑन स्क्रिन; अजय करणार दिग्दर्शन

डिसेंबर महिन्यात सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे.

सात वर्षांनी दिसणार बीग बी आणि अजय देवगण ऑन स्क्रिन; अजय करणार दिग्दर्शन

बॉलिवुडचे दोन सुपरस्टार आता एकाच पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता अजय देवगणने दिग्दर्शन क्षेत्रात आपलं पाऊल ठेवलं आहे. अजय देवगण दिग्दर्शित केलेला नवा सिनेमा लवकर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट म्हणजे यात बीग बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बीग बींच्या सिनेमाचं अभिनेता अजय देवगण दिग्दर्शन करणार आहे. ‘मेडे’ असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. डिसेंबर महिन्यात सिनेमाचं शुटींग सुरू होणार आहे. चित्रपट समीक्षक तरण अर्दश यांनी सोशल मीडियावरून बीग बी आणि अजय देवगण यांचे फोटो शेअर करून सिनेमा विषयी माहिती दिली आहे.

अभिनेता अजय देवगण हा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून पहिल्यांदा बीग बी अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अजय देवगण या सिनेमात दिग्दर्शनाबरोबरच अभिनय ही करताना दिसणार आहे. मेडे सिनेमात पायलटची मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र बीग बीच्या भूमिकेची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे. त्याचप्रमाणे सिनेमात आणखी कोणत्या कलाकारांचा अभिनय पाहता येणार आहे याबाबतही मौन पाळण्यात आलं आहे. सिनेनाचं शुटींग डिसेंबर महिन्यात हैद्राबादमध्ये सुरू होणार आहे.

अभिनेता अजय देवगणने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवताच त्यांनी पहिल्यांदा बीग बी अमिताभ बच्चन यांचा या सिनेमासाठी विचार केला असं म्हटलं जात आहे. मेडे हा सिनेमात थ्रिलर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे प्रेक्षक आतुर झाले आहे.

मेजर साहब, खाकी,सत्याग्रह या सिनेमांत अभिनेते अमिताभ बच्चन आणि अजय देवगण हे एकत्र अभिनय अभिनय केला होता. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी बीग बी आणि अजय देवगण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


हेही वाचा – परिणीती की सायना नेहवाल ओळखणंही झालं कठीण