घरमनोरंजनअजय देवगन साकारणार 'चाणक्य'

अजय देवगन साकारणार ‘चाणक्य’

Subscribe

दिग्दर्शक नीरज पांडे हे भारतातील एक महान राजा चंद्रगूप्त मौर्य याचे गुरू असलेल्या आचार्य चाणक्य यांच्या जीवनावर आधारीत चाणक्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. बॉलीवूडचा सिंघम या चित्रपटात चाणक्यांची भूमिका करणार आहे.

हल्ली मोजकेच चित्रपट करणारा बॉलीवूड अभिनेता अजय देवगन आता एका ऐतिहासिक भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘आचार्य चाणक्य’ यांच्या जीवनावर आधारीत या नव्या चित्रपटाचे कथानक असेल. क्रांतीकारक भगत सिंग यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘दी लेजंड ऑफ भगत सिंग’ नंतर १६ वर्षांनी अजय प्रेक्षकांना ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘चाणक्य’ असेल. नावाजलेले दिग्दर्शक नीरज पांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. याबाबतची माहीती स्वत: अजय देवगनने ट्विट करुन दिली आहे. चाणक्य भारतातील विद्वानांपैकी एक होते. त्यांनी जगाला दिलेले ज्ञान आजही लोकोपयोगी आहे. नेहमीच दर्जेदार चित्रपट देणारा दिग्दर्शक नीरज पांडे आणि त्याच्या जोडीला अजय देवगनसारखा कसलेला अभिनेता एकत्र येऊन ‘चाणक्य’ साकारणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

अजयचे बिझी शेड्युल

अजय सध्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत ‘तानाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट करतोय. त्यासोबत त्याच्याकडे पाचपेक्षा जास्त प्रोजेक्ट्स आहेत. आगामी काळात अजय ‘सन ऑफ सरदार २’, ‘राजनीती २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच दिग्दर्शक लव रंजन, पहलाज निहलानी, रेमो डुसुजा, अभिनव शुक्ला आणि भूषण कुमार या पाच दिग्दर्शकांसह प्रत्येकी एक असे अजयचे पाच चित्रपट येऊ घातले आहेत. तसेच अजय आगामी काळात दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिंबा या चित्रपटात स्पेशल अॅपियरन्स करणार आहे. अजयचा मागील वर्षी आलेला गोलमाल अगेन हा चित्रपट २०० करोड क्लबमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर यंदा त्याने बादशाहो आणि रेड असे दोन चित्रपट केले. यापैकी रेड सुरपहिट ठरला तर बादशाहोदेखील हिट झाला. त्यामुळे प्रेक्षक अजयच्या ‘तानाजी’ आणि ‘चाणक्य’कडे डोळे लाऊन बसले आहेत.

- Advertisement -

चाणक्यकडून जास्त अपेक्षा 

दुसऱ्या बाजुला दिग्दर्शक नीरज पांडे यांचा या वर्षी आलेला अय्यारी चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला. तर मागील वर्षी आलेला टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सहभागी झाला होता. पांडे आगामी काळात आपल्याला क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकच्या सिक्वलचे दिग्दर्शन करताना पहायला मिळणार आहेत. त्यासोबतच ते आता चाणक्य साकारणार आहेत. त्यामुळे नीरज पांडे यांना चाणक्यकडून जास्त अपेक्षा आहेत.

- Advertisement -

कोण साकारणार चंद्रगूप्त

आचार्य चाणक्यांनी एका सामान्य मुलाला सबंध भारतवर्षाचा राजा केला. चाणक्य यांच्या मार्गदर्शनामुळे चंद्रगुप्ताने जग पदाक्रांत करणाऱ्या अलेक्झांडरचा पराभव केला. आता चाणक्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार केला जात आहे. त्यामुळे चाणक्यांचा शिष्य असलेल्या चंद्रगुप्त मौर्यची भूमिका कोण साकारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -