घरमनोरंजनअक्षय आणि निशाचा रोमॅण्टीक अंदाज

अक्षय आणि निशाचा रोमॅण्टीक अंदाज

Subscribe

प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. कुणी मित्र-मैत्रीणीच्या साहाय्याने आपलं प्रेम प्रेयसीपर्यंत पोहोचवू पाहतो तर कुणी  क्लुकत्या शोधून काढतं. प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं म्हणतात. याच आशयाचं ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

चेतन गरुड प्रोडक्शन्स आणि टाइम्स म्युझिक मराठी यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ यागाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक वैभव लोंढे यांनी हे गाणं गायलं आहे. सुनील वाहूळ यांनी लिहिलेलय व संगीत दिलेल्या या गाण्यातील नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांनाही प्रेमात पडेल अशीच आहे. निशाणी बोरुळे आणि अक्षय जयेंद्रकेळकर यांच्यासोबतच विनीत शेट्टी, सुरज अलंकार आणि चैताली पाटील यांचाही या गाण्यात सहभाग आहे.

- Advertisement -

मंचरजवळील चपाटेवाडी येथील सुंदर लोकेशन्सवर खुलणारी ही प्रेम कहाणी दिग्दर्शन शुभम भुजबळ यांचं आहे. तर उत्तम सिनेमॅटोग्राफी कमलेश शिंदे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे.  होळी आणि रंगपंचमीचे औचित्य साधत ‘आधी होतं कडू आत्ता ग्वाड व्हाया लागलं’ या गाण्याचा सध्या टाइम्स म्युझिकमराठी चॅनेलवर तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -