घरमनोरंजनअक्षय - जॉन पुन्हा आमनेसामने

अक्षय – जॉन पुन्हा आमनेसामने

Subscribe

पुढच्या वर्षी अक्षयकुमार आणि जॉन अब्राहमचा 'मिशन मंगल' आणि जॉनचा 'बाटला हाऊस' एकाच दिवशी स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होणार आहे.

अक्षयकुमारने नुकतीच ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. २०१३ मध्ये यश मिळालेल्या मंगळयान मिशनवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शरमन जोशी असे कलाकारही आहेत. पण २०१९ च्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम आमनेसामने येत आहेत. यावर्षी देखील अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ एकाच वेळी प्रदर्शित झाला होता. तर पुढच्या वर्षी आता ‘मिशन मंगल’ आणि जॉनचा ‘बाटला हाऊस’ एकाच दिवशी स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित होणार आहे.

पुन्हा एकदा अक्षय आणि जॉनचा बॉक्स ऑफिस मुकाबला

जॉन आणि अक्षय खरे तर दोघंही चांगले मित्र आहेत. यावर्षी दोघांच्याही चित्रपटाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर चांगली कमाई केली होती. मात्र बऱ्याच जणांचं लक्ष दोघांच्याही चित्रपटांच्या कलेक्शनवर होतं. अर्थातच जॉनच्या सत्यमेव जयतेपेक्षा गोल्डने जास्त कमाई केली असली तरीही दोन्ही चित्रपट चांगले चालले होते. पुन्हा एकदा हेच चित्र पुढच्यावर्षीही दिसून येणार आहे. ‘बाटला हाऊस’ विरुद्ध ‘मिशन मंगल’ असे दोन तगडे चित्रपट आणि दोन तगडे कलाकार पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट एल – १८ बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काऊंटरवर आधारित चित्रपट असून ‘मिशन मंगल’ हा चित्रपट यशस्वी मंगळयानासंदर्भातील असणार आहे. शिवाय दोन्ही चित्रपटाची कथा भारदस्त असल्यामुळे नक्की कोणत्या चित्रपटाला जास्त यश मिळेल याकडेही लक्ष लागून राहील. त्यामुळे आता पुढच्या वर्षीही प्रेक्षकांना नक्की कोणता चित्रपट बघायचा याचा विचार नक्कीच पडणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -