Video: ‘सूर्यवंशी’च्या सेटवर कतरिनासह अक्षयकुमार दिसला रोमँटिक अंदाजात

फिलहाल या चित्रपटाच्या टीझरवरच्या कमेंट वाचल्यानंतर काही लोकांना नमस्ते लंडन या चित्रपटाची आठवण केल्यानंतर अक्षयने दिले खास सरप्राईज

Mumbai

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टीचा सूर्यवंशी या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अक्षय त्याच्या को-अॅक्टर कतरिना कैफसोबत दिसणार आहे. अक्षयने कतरिना सोबतचा एक व्हिडिओ त्याच्या ट्विटरवरून शेअक केला आहे. मात्र यामध्ये एक ट्विस्ट आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय फिलहाल गाण्यावर कतरिनासोबत रोमँटिक अंदाजात दिसतोय. अक्षयने हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांच्या इच्छेखातर बनवला आहे.

यावेळी त्याच्या चाहत्यांनी अक्षयच्या गाण्यावर जेव्हा नुपूर सनोनसोबत बघितल्यावर त्यांना नमस्ते लंडन या चित्रपटाची आठवण आली आहे. यावेळी चाहत्यांनी कमेंट करत याचा उल्लेख केला तेव्हा अक्षयने कतरिनासोबतचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने असे लिहिले की, फिलहाल या चित्रपटाच्या टीझरवरच्या कमेंट वाचल्यानंतर काही लोकांना नमस्ते लंडन या चित्रपटाची आठवण करून दिली. योगायोगाने मी सूर्यवंशीची शुटिंग आमच्या जॅज अर्थात कतरिनासोबत करत आहे. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी एक लहानसं सरप्राइज गिफ्ट घेऊन आलो आहे.

फिलहालच्या गाण्याला पंजाबी गायक बीप्राकने गायले आहे. यांनीच अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटासाठी देखील गाणं गायलं होतं. सूर्यवंशीमध्ये अक्षय कतरिना सोबत ९ वर्षांनंतर दिसणार आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला तीस मार खानमध्ये दोघे दिसले होते. या दोघांनी एकत्र यशस्वी चित्रपट केले आहेत.