घरमनोरंजनअक्षयकुमार चढला कमाईच्या बाबतीत सलमानच्या वरचढ

अक्षयकुमार चढला कमाईच्या बाबतीत सलमानच्या वरचढ

Subscribe

अक्षयकुमार चढला कमाईच्या बाबतीत सलमानच्या वरचढ ठरला आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये सलमान नवव्या स्थानावर तर अक्षयला सातवं स्थान मिळालं आहे.

फोर्ब्सनं दिलेल्या यादीनुसार, अक्षयकुमार वर्षभरात २८३.५ कोटी इतकी कमाई करत असून सलमान खाननं वर्षभरामध्ये २६९.५ कोटी रुपये कमावले आहेत. मागच्या वर्षी याच फोर्ब्सच्या यादीमध्ये अक्षयकुमार १० व्या स्थानी होता. यावर्षी अक्षयकुमारच्या चित्रपटांनी बॉक्स-ऑफिसवर अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं त्यानं ७ व्या क्रमांकावर झेप घेतली असून सलमान मागच्या वर्षीदेखील नवव्या स्थानावर होता आणि यावर्षीदेखील त्यानं हे स्थान टिकवून ठेवलं आहे. दरम्यान या यादीनुसार पहिल्या स्थानावर हॉलीवूडमधील जॉर्ज क्लुनीचं नाव आहे. वर्षभरातील जॉर्जची कमाई ही १,६७३ कोटी रुपये इतकी आहे. तर चित्रपटात काम करण्याव्यतिरिक्त जॉर्जचे अन्य व्यवसायदेखील आहेत.

फोर्ब्सद्वारे टॉप १० कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी

१. जॉर्ज क्लुनी – १,६७३ कोटी रुपये
२. ड्वेन जॉन्सन – ८६८ कोटी रुपये
३. रॉबर्ट डाऊने ज्युनिअर – ५६७ कोटी रुपये
४. क्रिस हेमस्वोर्थ – ४५१.५ कोटी रुपये
५. जॅकी चैन – ३१८.५ कोटी रुपये
६. विल स्मिथ – २९४ कोटी रुपये
७. अक्षय कुमार – २८३.५ कोटी रुपये
८. अॅडम सेंडलर – २७६.५ कोटी रुपये
९. सलमान खान – २६९.५ कोटी रुपये
१०. क्रिस इवांस – २३८ कोटी रुपये

- Advertisement -

अक्षय सध्या ‘गोल्ड’मुळे चर्चेत

नुकताच अक्षयचा ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शित झाला असून आतापर्यंत ७३ कोटीच्या आसपास कमाई या चित्रपटानं केली आहे. लवकरच १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अक्षयकुमार सध्या या चित्रपटासाठी चर्चेत आहे. तर सलमान खानचा ‘रेस ३’ मात्र कमाल दाखवू शकला नाही. पण टीव्हीवरील ‘दस का दम’ शो मुळं सध्या सलमान चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -