घरमनोरंजनबॉलिवूडच्या खिलाडीने पत्नीला दिले 'हे' खास गिफ्ट

बॉलिवूडच्या खिलाडीने पत्नीला दिले ‘हे’ खास गिफ्ट

Subscribe

ट्विंकल खन्नाला हे खास गिफ्ट खूप आवडलं आणि म्हणाली कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपली मनं जिंकू शकतात.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह अभिनेत्री करिना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियार अडवाणी प्रमुख भूमिकेत आहेत. जरी अक्षय कुमार ‘गुड न्यूज’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असला तरी त्याने आपल्या पत्नीसाठी गिफ्ट आणण्यास विसरला नाही. अक्षय आपल्या पत्नीला म्हणजे ट्विंकल खन्नाला एक अजब असं खास गिफ्ट दिलं आहे. त्याने ट्विंकला ‘कांद्याचे झुमके’ हे खास गिफ्ट म्हणून दिले आहेत. अक्षयने दिलेल्या या झुमक्यांचा फोटो ट्विंकलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

ट्विंकल हे खास गिफ्ट खूप आवडलं आहे. ट्विंकल खन्नाचे हे कांद्याचे झुमके सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना असं लिहिलं आहे की, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपली मनं जिंकू शकतात. माझा पार्टनर ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये परफॉर्म करून परत आला आणि म्हणाला, हे झुमके करिना कपूरला दाखवतं होतो. पण तिला हे आवडणार नाही म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आलो.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना एक चांगली अभिनेत्री असून ती लेखक आणि निर्माती देखील आहे. तर अक्षय कुमारचा येत्या २७ तारखेला ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट ‘आयव्हीएफ’ या विषयावर आधारित आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटा व्यतिरिक्त लवकरच अक्षय कुमार ‘लक्ष्मी बोंब’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘गांधी हत्या आणि मी’ नाटकासाठी १४ पुस्तकांचा आधार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -