घरमनोरंजनखोटी बातमी छापल्याने अक्षय कुमार भडकला; म्हणाला, कायदेशीर कारवाई करणार

खोटी बातमी छापल्याने अक्षय कुमार भडकला; म्हणाला, कायदेशीर कारवाई करणार

Subscribe

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चुकीच्या बातमीमुळे चांगलाच भडकला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयने त्यांच्या बहिणीसाठी स्पेशल चार्टर्ड प्लेन बुक केल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली होती. अक्षयची बहिण आपल्या दोन मुलांसह या चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करणार असल्याचे त्यात नमूद केले होते. मात्र अक्षयने ही बातमी अत्यंत चुकीची असून त्यावर संतापही व्यक्त केला आहे. त्याने यासंबंधी ट्विट करून प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपण आपल्या बहिणीसाठी कोणतीही विशेष सेवा उपलब्ध केली नसून तिला दोन नाही तर एकच मुलं असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपली बहिण कुठेही गेली नसल्याचेह त्याने नमूद केले. शिवाय अशी अफवा आणि खोटी बातमी पसरवणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्याने दिला आहे.

हेही वाचा – Video: नर्गिसच्या आठवणीने संजय दत्त झाला भावूक; केली पोस्ट शेअर

- Advertisement -

काय आहे प्रकरण

हा विषय इंडिया फोरम डॉट कॉमच्या बातमीशी संबंधीत आहे. या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार अक्षयने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहिणीसाठी संपूर्ण फ्लाइट बुक केल्याचे सांगण्यात आले. हे विमान मुंबई ते दिल्लीसाठी रवाना होईल. या विमानात एकूण १८६ प्रवाशांची व्यवस्था आहे. परंतू अक्षयने संपूर्ण विमान बुक केल्यामुळे केवळ चार जण म्हणजे त्यांनी बहिण, दोन मुलं आणि मोलकरीण या विमानातून जाणार असल्याचे बातमीत म्हटले होते. मात्र ही बातमी तथ्यहिन असल्याचा खुलासा अक्षयने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -