घरमनोरंजनखिलाडी कुमारचा 'हा' खतरनाक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल

खिलाडी कुमारचा ‘हा’ खतरनाक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल

Subscribe

अक्षयने हा स्टंट करतानाचा फोटो बुधवारी इंस्टाग्रामवर शेअर केला

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता म्हणजेच अक्षय कुमार आपल्या खतरनाक स्टंटबाजी करिता ओळखला जातो. अक्षय कुमारच्या सगळ्याच चित्रपटात स्वतः स्टंट करताना दिसतो. सध्या अक्षय रोहित शेट्टी दिग्दर्शित करत असलेल्या सूर्यवंशी या चित्रपटाची शुटिंग करत आहे. याच चित्रपटातील एक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमार हॅलिकॉप्टरला लटकत स्टंट करताना दिसतोय तर त्याच्यासोबत या फोटोमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी बाईक चालवताना दिसतोय.

- Advertisement -

खिलाडी कुमारचा आगामी चित्रपट सूर्यवंशी हा सतत चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचे शुटिंग बॅंकॉकमध्ये सुरू असून अक्षयने हा स्टंट करतानाचा फोटो बुधवारी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो बघून कोणाचाही श्वास थांबेल यात शंकाच नाही.

यापुर्वी सोशल मीडियावर सूर्यवंशीच्या सेटवरचा फोटो व्हायरल झाला होता, यातील एका फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. या फोटोमध्ये अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, करन जोहर आणि रोहित शेट्टी एकत्र दिसत आहेत.

- Advertisement -

 

हा फोटो शेअर करताना अक्षयने अवाहन करत असे लिहीले की, असा स्टंट करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, हे सगळे स्टंट एक्सपर्टच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. ‘सूर्यवंशी’ मध्ये अक्षय कुमारशिवाय कतरिना कॅफ, नीना गुप्ता देखील अभिनय करताना दिसणार आहे.

या २०१९ व्या वर्षी अक्षयचे ‘हाउसफुल ४’ आणि ‘गुड न्यूज’ प्रदर्शित होणार आहे. तसेच, २०२० मध्ये ‘सूर्यवंशी’ शिवाय ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

?

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -