घरमनोरंजनForbes 2020: सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अक्षय कुमारचा नंबर!

Forbes 2020: सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अक्षय कुमारचा नंबर!

Subscribe

यावर्षी १०० लोकांच्या यादीत अक्षय कुमार ३६ हजार ५२५ कोटींची कमाई करून ५२ व्या स्थानावर खिलाडी कुमार आहे

बॉलिवूड विश्वाचा खिलाडी कुमार अशी ओळख असणारा अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक आहे. आणि आता अक्षय कुमार जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलेब्सच्या यादीत सामील झाला आहे. फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची २०२० या वर्षातील यादी प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या फोर्ब्सच्या यादीमध्ये केवळ अक्षय कुमारचाच समावेश आहे. यावर्षी १०० लोकांच्या यादीत अक्षय कुमार ३६ हजार ५२५ कोटींची कमाई करून ५२ व्या स्थानावर खिलाडी कुमार आहे.

या यादीमध्ये सामील झाल्यानंतर अक्षयने बॉलिवूड कलाकार विल स्मिथ आणि जेनिफर लोपेझ यांना मागे टाकले आहे. यासह अक्षयने प्रसिद्ध हॉलिवूड गायक रिहानालाही मागे टाकले आहे. २०१९ च्या तुलनेत यंदाच्या क्रमवारीत थोडीशी घसरण झाली असून मागील वर्षी अक्षय कुमार ४९० कोटींच्या कमाईसह ३३ व्या क्रमांकावर होता.

- Advertisement -

फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने आपल्या यशाबद्दल सांगितले की, ‘तुम्हाला कालांतराने स्वत: ला बदलावे लागते. आज चित्रपटांच्या कथा बदलल्या आहेत, प्रेक्षक बदलले आहेत, अगदी माझ्या चेकवरील शून्यही बदलले आहेत. सर्व काही बदलत आहे. हिच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे.

तसेच अक्षय कुमार म्हणाला, मला फक्त १० कोटी रुपये कमवायचे होते. मी शेवटी माणूसच आहे. जेव्हा मी १० कोटी कमावले तेव्हा मी विचार केला की मी १०० कोटी का कमवू शकत नाही? खरे सांगायचे तर मी या नंतर थांबलो नाही. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर त्याचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अहवालानुसार, चित्रपटाचे एक्सक्लूसिव्ह प्रीमिअर राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे खरेदी केले गेले आहेत.


सोनू सूदच्या नावाने होत आहे फसवणूक; ट्विट करत केले सावध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -