Video: दिवाळीला ‘लक्ष्मी बॉम्ब’ फुटणार, अक्षयने जाहीर केली चित्रपटाची तारीख!

Laxmmi-Bomb

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच चर्चेत आला आहे. त्यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांच लक्ष लागयल. अखेर अक्षय कुमरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट लक्ष्मी बॉम्ब च्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षयने नुकतचं ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. येत्या ९ नोव्हेंबर रोजी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा आगळ्या वेगळ्या विषयाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या दिवाळीला तुमच्या घरी लक्ष्मीसोबतच धमाकेदार बॉम्बसुद्धा येईल, असं म्हणत अक्षयने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. ९ नोव्हेंबरने डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील अक्षयच्या भूमिकेविषयी फार उत्सुकता आहे. कारण तो एका ट्रान्सजेंडर भूताची भूमिका साकारत आहे. अक्षयच्या लूकचीसुद्धा खूप चर्चा झाली होती.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र लॉकडाउन असल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. याच कारणास्तव चित्रपटाच्या टीमने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.