घरमनोरंजनमोदी ही बघतात 'ट्विंकल खन्ना' चं ट्विट

मोदी ही बघतात ‘ट्विंकल खन्ना’ चं ट्विट

Subscribe

सध्या सोशलमिडीयावर खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीचीच चर्चा आहे. अक्षयचे भन्नाट प्रश्न आणि मोदींची त्यावरील भन्नाट उत्तर अशी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. ही नॉन पॉलिटीकल मुलाखत प्रेक्षकांनाही खूप आवडली. मुलाखती दरम्यान अक्षयला एक गोष्ट समजली. चक्क पंतप्रधना मोदी ट्विंकल खन्नाचं ट्विटर अकाऊंट बघतात.

मुलाखतीदरम्यान अक्षयने मोदींना सोशलमिडीयाशी निगडीत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी अक्षयचीच विकेट काढली. सोशल मीडियावर सुरु असलेल्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देता का? असा प्रश्न अक्कीने मोदींना विचारला. यावर मोदींनी अक्षयलाच गप्पा केलं. त्यांनी चक्क अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाचा उल्लेख केला.

- Advertisement -

मोदी म्हणाले, मी सोशलमिडीयावर बारीक लक्ष ठेवून असतो. यामुळे अनेक प्रकारची माहिती मिळते. मी तुमचे ट्विट्सही पाहतो,तसेच ट्विंकल खन्नाजींचेही ट्विट्स पाहतो. असे मोदींनी म्हणताच अक्षयलाही हसू आलं. यावर मोदी म्हणाले, ट्विंकल माझ्यावर इतका राग काढतात. त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा राग माझ्यावर निघतो. त्यामुळे तुम्हाला शांतता मिळत असेल. एकप्रकारे यामाध्यमातून काही होईना, मी तुमच्या कामी येतो,’ असे मोदी हसत हसत म्हणाले. मोदींचे हे उत्तर ऐकून अक्षयही हसू रोखू शकला नाही. यावेळी मोदींनी ट्विंकलच्या आजोबांना भेटल्याचा एक किस्साही अक्षयला ऐकवला.

- Advertisement -

मोदींच्या उत्तराला ट्विंकलचं उत्तर

मोदींच्या उत्तराला ट्विकलने ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. ‘मी मोदींच्या उत्तराकडे सकारात्मकदृष्टीने बघते. मी ट्विटरवर आहे, हे पंतप्रधानांना केवळ माहितच नाही तर ते माझे ट्विट्स वाचतातही…,’असे ट्विंकलने ट्विटरवर लिहिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -