अक्षयसह सोनू सूदने सुरू केली ‘पृथ्वीराज’ची शूटिंग; मानुषी छिल्लर होणार उद्यापासून जॉईन

मानुषी छिल्लर १३ ऑक्टोबरला शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे तर संजय दत्त दिवाळीनंतर शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नुकताच ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर भारतात परतला आहे. भारतात येताच त्याने ‘पृथ्वीराज’ या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी म्हणाले, “आम्ही पृथ्वीराजच्या शूटिंगला यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये सुरुवात केली आहे आणि संपूर्ण टीम शूटिंग सुरू करण्यात खूप उत्सुक आहे.”

अक्षय कुमारने १० ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तर सोनू सूदने देखील १० ऑक्टोबरपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हे शूटिंग वेळापत्रक पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व काही सुरळीत असल्याची खात्री करून टीमने नॉन स्टॉप काम सुरू केले आहे.” अक्षय कुमारची सहकलाकार मानुषी छिल्लर आणि संजय दत्तही याच शूटिंगमध्ये सहभागी होणार आहेत.

उद्यापासून मानुषी होणार सहभागी म्हणाली…

या मोठ्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू झाले ही चांगली बातमी असून पुन्हा एकदा इंडस्ट्री सुरू होत आहे. मानुषी छिल्लर १३ ऑक्टोबरला शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे तर संजय दत्त दिवाळीनंतर शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. या चित्रपटासाठी उत्सुक असलेली मानुषी म्हणाली की, तिचे आयुष्य आतापर्यंत एखाद्या परीकथासारखे आहे, आता ती तिच्या मोठ्या पदार्पणाची वाट पाहत आहे.

मानुषी एका मुलाखतीदरम्यान म्हणाली, “या प्रवासातून शिकलेल्या गोष्टींबद्दल मला खूप आनंद आहे. माझे आतापर्यंतचे आयुष्य खरोखरच एक काल्पनिक परीकथा आहे, मिस इंडिया बनण्यापासून ते मिस वर्ल्ड होण्यापर्यंत आणि पहिल्या मोठ्या चित्रपटाचा एक भाग होणं.. ही माझ्या आयुष्यातील एक नवीन रोमांचक घटनाच आहे.


Mumbai Power Cut: बिग बी ते कंगनापर्यंत अनेकांनी केले ट्विट; कुणाचा सल्ला तर कुणाचा हल्ला