घरमनोरंजनअक्षय कुमारच्या 'गोल्ड'ने रचला इतिहास!

अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ने रचला इतिहास!

Subscribe

सौदी अरेबियात गोल्ड हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा गोल्ड हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.

अक्षय कुमारच्या गोल्डने प्रेक्षकांची वाहवा मिळवलीच, पण अनेक विक्रम आपल्या नावावर केले. या गोल्डच्या संपूर्ण टीमसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. आता या चित्रपटाच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. सौदी अरेबियात गोल्ड हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा गोल्ड हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.

अक्षयने ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे.

- Advertisement -

चित्रपटगृहांवर बंदी होती

गेल्या अनेक वर्षांपासून सौदीत चित्रपटगृहांवर बंदी होती. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या चित्रपटगृहांवरची बंदी उठवली आहे. २०१८ ला एप्रिल महिन्यात ही बंदी उठवण्यात आली. ही बंदी उठवल्याने जगभरातील विविध चित्रपटांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

- Advertisement -

का होती चित्रपटगृहांवर बंदी

१९७०मध्ये सौदीत चित्रपटगृह होते. चित्रपटांमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख बिघडते. असं तिथल्या कट्टरपंथीयांचं म्हणणं होतं. त्यामुळे इस्लामी कट्टरपंथीयांच्या दबावामुळे देशभरात चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

या कथेवर आधारीत आहे गोल्ड

ही एका व्यवस्थापकाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याआधी जर्मनीत ब्रिटिशांसाठी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंचा व्यवस्थापक म्हणून तपन दास काम करायचे. स्वतंत्र भारताचा हॉकी संघ असावा, त्या संघाने ऑलिम्पिकमध्ये खेळावे असं स्वप्न तपन दास यांचं होतं. त्यांच्या या जिद्दीची कहाणी म्हणजे गोल्ड हा सिनेमा.


तुम्ही हे वाचलंत का? – ‘गोल्ड’ नाही तर ‘हा’ होता मौनी रॉयचा पहिला चित्रपट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -