म्हणून अक्षय निवडणूक लढणार नाही

अक्षय कुमार निवडणूक लढवणार नसल्याच जाहीर केलं आहे. या आधी करीना कपूर,संजय दत्त,सनी देओल निवडणूक लढवणार असल्याची अफवा पसरली होती.

Mumbai
akshay kumar
अक्षय कुमार

जशजशी निवडणूक जवळ येत आहे तसतश्या नवनवीन अफवा पसरत आहेत. एकीकडे राजकारणी एकापेक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या घेत आहेत. तर दुसरीकडे अनेक सेलेब्रेटी राजकारणात येणार असल्याच्या अफवांना ऊत आला आहे. करीना कपूर,सनी देओल, संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार अश्या अफवा सुरू असतानाच अक्षय कुमार राजकारणात प्रवेश करणार असल्याची अफवा पसरली. मात्र आपण निवडणूक लढवणार नसल्याचं अक्षयने स्पष्ट केलं आहे.

‘राजकारणात येण्याचा माझा विचार नाही. जे मी माझ्या चित्रपटातून करतो आहे ते काम राजकारणातून कधीही साध्य होणार नाही’ असं म्हणत अक्षयने निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. या आधीही अभिनेत्री करीना कपूरने देखील निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

अशी पसरली अफवा

अक्षय कुमार अमृतसर मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारला मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे अक्षय राजकारणात येतोय अशा चर्चा होत्या. मात्र अक्षयने या सगळ्या अफवा असल्याच सांगत यावर पडदा टाकला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here