घरमनोरंजनअक्षय कुमारचा मुलगा आरव करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण ?

अक्षय कुमारचा मुलगा आरव करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण ?

Subscribe

बॉलिवूड क्षेत्रात अभिनेता शहारूख खानचा मुलगा आर्यन एन्ट्री करणार अशी जोरदार अफवा सर्वत्रच पसरली होती. तशीच काहीशी चर्चा अक्षय कुमारचा मुलगा आरव याबद्दल होतांना दिसत आहे. मात्र याच उधान आलेल्या चर्चांना अक्षयने एका मुलाखतीत पुर्ण विराम दिला आहे.

खिलाडी अक्षय कुमारच्या बॉक्स ऑफिसवर येणाऱ्या बॅक टू बॅक चित्रपटामुळे तो सुपरहिट हिरो ठरला आहे. अक्षयच्या येणाऱ्या नवनवीन चित्रपटातून जसे की, केसरी चित्रपटास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता त्याच्या प्रसिद्धीकरिता वेगवेगळ्या प्रकारचे तर्क लावले जात आहे. बॉलिवूड क्षेत्रात अभिनेता शहारूख खानचा मुलगा आर्यन एन्ट्री करणार अशी जोरदार अफवा सर्वत्रच पसरली होती. तशीच काहीशी चर्चा अक्षय कुमारचा मुलगा आरव याबद्दल होतांना दिसत आहे. मात्र याच उधान आलेल्या चर्चांना अक्षयने एका मुलाखतीत पुर्ण विराम दिला आहे.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

- Advertisement -

अक्षयचा मुलगा आराव आपल्या वडीलांच्या पावलांवर पाऊल ठेवणार की नाही? असे विचारले असता अक्षय म्हणाला, ”आरव फक्त १६ वर्षाचा आहे, तो त्याला हवे तसे त्याचे आयुष्य जगतो आहे. त्यामुळे भविष्यातील करिअर बद्दल आताच त्याच्याशी चर्चा करून कोणताही दबाव आणायचा नाही.” यासोबतच तो असेही म्हणाला की, मुलांवर काही पालक सतत दबाव टाकत असतात. अशा प्रकारातील पालक मला व्हायचे नाही. तसेच, ”माझ्या मुलाला चित्रकार, डॉक्टर बनवायचे आहे, याबद्दल माझे विचार खुप स्पष्ट आहे. ”

अभिनय क्षेत्रात २८ वर्ष पुर्ण करणाऱ्या अभिनेत्याने मुलाखतीत सांगितले की, ”माझ्या वडीलांनी कधी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही. याउलट माझे वडील नेहमीच म्हणायचे की, क्रीडा आणि कराटे या क्षेत्रात आवड असेल तर, ब्रुस ली सारखे हो. त्याचा सारखाच नाही तर किमान तसा होण्याचा प्रयत्न कर. नीतारा आणि आराव या आपल्या मुलांबद्दल बोलताना म्हणाला की, ”कोणत्याच दबावा शिवाय त्यांना आरामदायी आयुष्य मिळाले आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या आयुष्याचा विचार करत त्यांना पाठिंबा देत असतात. परंतु, नेहमीच त्यांच्या सोबत असतीलच असे नाही. त्यामुळे मुलांनी स्वतःचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -