घरमनोरंजनआलिया भट्टचा 'सडक २' वादात! सोशल मीडियावर Boycott ची मागणी!

आलिया भट्टचा ‘सडक २’ वादात! सोशल मीडियावर Boycott ची मागणी!

Subscribe

सोशल मीडियावर #BoycottBollywoodFilms हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये...

२१ वर्षानंतर महेश भट्ट पुन्हा एकदा आपल्या चित्रपटाचा सिक्वल ‘सडक २’ या चित्रपटाद्वारे पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात संजय दत्तदेखील आलिया भट्ट आणि पूजा भट्ट यांच्यासोबत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यात बरेच लोक संतप्त झाले आणि सोशल मीडियावर #BoycottBollywoodFilms ट्रेंड करत आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. काही दिवसातच दुसरे पोस्ट प्रदर्शित केले आहे. आलिया भट्टने हे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे. २८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. ‘सडक २’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे. मात्र केवळ एके काळच्या हिट चित्रपटाचा सिक्वेल म्हणून सडक-२ चर्चेत नाही आहे, तर याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे.

- Advertisement -

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम या मुद्द्यावरूव बऱ्याच चर्चा आणि वाद-विवाद झाले आहेत. नेपोटिझमवरून वाद सुरू असताना घराणेशाही तसेच स्टार किड्सना देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आल्याचं बघायला मिळालं.

याचेच उदाहरण म्हणजे सडक-२ मधील मूख्य भूमिकेतील सर्वच कलाकार स्टार किड्सपैकी एक आहेत. सुशांतच्या निधनानंतर महेश भट्ट यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या मुलींना घेऊन करण्यात आलेल्या या चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान चित्रपटावर बहिष्कार टाकण्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

 

सडक २ ला पहिल्या पोस्टर प्रदर्शनापासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तर सोशल मीडियावर आलिया भट्टचे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी वाढत आहे. सडक-२ विरोधात अनेक युजर्सनी मोहीमच सुरू केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #BoycottBollywoodFilms हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहे.


Sushant Singh Suicide प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड; सुशांतच्या डायरीची पाने गहाळ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -