आलियाने शेअर केली तिची सिक्रेट फेव्हरेट रेसिपी

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिची सिक्रेट फेव्हरेट रेसिपी शेअर केली आहे.

Mumbai
Alia Bhatt takes us inside her kitchen to whip up two of her favourite dishes
आलियाने शेअर केली तिची सिक्रेट फेव्हरेट रेसिपी

सेलिब्रिटींनी एखादी गोष्ट केली का त्या गोष्टीची चांगलीच चर्चा होते आणि ती गोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होते. सध्या अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. चक्क बॉलिवूड अभिनेत्री आलियाने तिची फेव्हरेट रेसिपी शेअर केली आहे. तिचा हा कुकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्याने तिचे कौतुक केले आहे. तर आलिया सारख्या सेलिब्रिटीला स्वयंपाक येतो हे पाहून अनेकांना तिचे अप्रूप वाटले आहे.

 

काय म्हणाली आलिया…

आलियासाठी दररोज स्वयंपाक करणाऱ्या शेफ दिलीप याच्या मदतीने दाक्षिणात्य पद्धतीने एक ‘बीटरुट सॅलेड’ तयार केले आहे. बीट कापण्यापासून ते बनवण्यापर्यंत सर्व काही ती (दिलीपच्या सल्ल्यानुसार) करते. तसेच ती यामध्ये फोडणी देताना प्रचंड घाबरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे पाहताना अनेकांना फार गंमत वाटली आहे. तसेच ती कुकिंग करीत असतानाच काही गोष्टी शेअर करत आहे. त्यात ती म्हणते की, ती दर दहा – बारा दिवसांनी आपला डाएट प्लॅन बदलते. याचे कारण देखील तिने दिले आहे. ती म्हणते की, एक सारखे जेवण जेऊन ती कंटाळते. तसेच खाण्या – पिण्याच्या बाबतीत आपण पझेसिव्ह असल्याचेही तिने सांगितले आहे.

आलियाचे गुपित…

आलियाने तिचे गुपित सांगितले आहे. ती म्हणते जेव्हा मी शूटिंगकरता आऊटडोअरला जाते, त्यावेळी मी माझ्या शेफला सोबत घेऊन जाते. तसेच मुंबईतच शूटिंग असेल तरी ती घरातून आलेल्या डब्यातीलच जेवण जेवते. त्याचप्रमाणे तिचा शेफ उशीरा आला किंवा तिला जर जेवण आवडले नाहीतर तिची चिडचिड देखील होते, असे देखील तिने मोकळ्यामनाने सांगितले आहे. तसेच आलियाला गोड पदार्थ अतिशय आवडतात आणि ती रात्री – अपररात्री उठून फ्रिजमधील पदार्थ खाते, तशी तिला सवय असल्याचे तिच्या शेफने सांगितले आहे.


हेही वाचा – दाक्षिणात्य स्टार विजय ‘या’ चित्रपाटतून करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण