‘इंशाअल्लाह’ नंतर भन्साळींच्या ‘या’ चित्रपटात दिसणार आलिया

हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

Mumbai

बॉलिवूड विश्वातील दीपिका पादुकोण नंतर आता आलिया भट्ट बॉलिवूडचे चित्रपट निर्माते संजय लीली भन्साळींची आवडती झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ‘इंशाअल्लाह’ नंतर भन्साळीच्या दुसऱ्या आगामी चित्रपटात आलियाला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाकरिता साइन केले आहे. आजच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

माफिया क्वीनवर आधारलेला चित्रपट

मुंबईमधील गंगूबाई माफिया होती. भन्साळींचा हा चित्रपट मुंबईच्या माफिया क्वीन गंगूबाई कोठेवाली या नावाच्या पत्रकार एस हुसेन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाला पेन इंडिया आणि भन्साळी प्रोडक्शन निर्मिती करणार आहे. यासंदर्भातील घोषणा करत भन्साळींनी या चित्रपट प्रदर्शनाची तारिख निश्चित केली असून हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाशिवाय आलिया ‘इंशाअल्लाह’ यामध्ये सलमान खान सोबत दिसणार होती. मात्र सलमानने हा चित्रपट सोडल्याने आता या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.


अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या फोटोशूटवर भडकले नेटकरी; केल्या भन्नाट कमेंट