मतदान करा, असे सांगणारी आलियाच करू शकणार नाही मतदान

मतदानाचे आवाहन करणारी अभिनेत्रीच यंदाच्या निवडणुकीत स्वतः मतदान करू शकणार नाही.

Mumbai

संपुर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधूमाळी बघायला मिळत आहे. एक महिनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांसारख्या सेलिब्रेटींना मतदान करण्याचे आवाहन करण्याची विनंती केली होती. यावेळी, काही सेलिब्रिटींसह आलियाने ट्वीट करत लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र हे मतदानाचे आवाहन करणारी अभिनेत्रीच यंदाच्या निवडणुकीत स्वतः मतदान करू शकणार नाही.

खरंतर आलिया तिच्या कलंक या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान ती आपल्या संपूर्ण टीमसह एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचली होती. २६ वर्षीची असणारी आलिया एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ती मतदान करू शकणार नाही. या मुलाखतीत कलंक चित्रपटाच्या स्टार कास्टमधील आलियाला विचारण्यात आले की, आता निवडणुकीला सुरूवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

♥️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on

त्यामुळे, नवे सरकार निवडून देण्यासाठी तुझे कोणते प्रयत्न असतील? तू मतदान करायला जाणार का? या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, मी मतदान करू शकत नाही. याचे कारण असे की, ”माझ्याकडे भारताचा पासपोर्ट नाही. कारण मी ब्रिटीश नागरिक असल्याने माझ्याकडे तिकडचे नागरिकत्व आहे. तसेच, माझी आई सोनी राजदानी ब्रिटीश नागरिक असल्याने आलियाकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here