‘असा’ नवरा मला तरी नको; सांगतेय आलिया भट्ट

''माझे बाबा महेश भट्ट एक उत्तम पिता आहेत. मात्र, माझा होणारा नवरा त्यांच्याप्रमाणे नसावा'', असं आलियाने म्हटलं आहे.

Mumbai
alia talks about her future husband

बॉलीवूडची ‘राझी गर्ल’ आलिया भट्ट सध्या यशाच्या शिखरावर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या ‘कलंक’ या तिच्या आगामी चित्रपटाची तर जोरजार चर्चा आहे. या चित्रपटातील नुकतंच रिलीज झालेलं ‘घर मोहे परदेसीया’ हे गाणं तर सोशल मीडियावर धुमाकुळ घालतं आहे. आलियाच्या अभिनयाचे चाहते हे गाणं पाहिल्यावर तिच्या दमदार नृत्याचेही चाहते झाले असणार यात काहीच शंका नाही. आलियाने या गाण्यातील तिच्या कथ्थक नृत्याने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे. आता बॉलीवूड सेलिब्र्टी म्हटलं की जितकी त्याच्या कामाची चर्चा होते, तितकीच त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही बोललं जातं. कोणता स्टार लग्न करतोय? कोण कुणाला डेट करतंय? कुणाचं ब्रेकअप झालं आहे आणि कुणाचं पॅचअप याविषयी चर्चा ही होतेच. आलियादेखील याला अपवाद नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबत अनेक अफवा उठत असताना, आपल्याला नेमका कसा नवरा हवा? याचा आलियाने खुलासा केला आहे.

नवरा बाबांसारखा नसावा…

आलियाने सध्या ती लग्नाचा विचार करत नसल्याचं अनेकदा माध्यमकर्मियांशी बोलताना सांगितलं आहे. मात्र, नुकत्याच एका खासगी मुलाखतीमध्ये तिने आपल्याला नेमका कसा नवरा हवा याचा खुलासा केला आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील रोल मॉडेल आणि हिरो असतात. त्यामुळे आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार अर्थात आपला नवरा हा आपल्या वडिलांप्रमाणेच असावा असं मुलींना वाटत असतं. मात्र, आलियाला तिचा होणारा नवरा वडीलांप्रमाणे नसावा असं वाटतंय. एका चॅट शोमध्ये तिने याचा खुलासा केला आहे. ”माझे बाबा महेश भट्ट एक उत्तम पिता आहेत. मात्र, माझा होणारा नवरा त्यांच्याप्रमाणे नसावा”, असं आलियाने यावेळी म्हटलं. मात्र, यामागचं कारण काही तिने स्पष्ट केलं नाही. आलियाच्या या कमेंटनंतर आता तिच्याविषयी कोणत्या नव्या चर्चांना उधाण येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here