घरमनोरंजन'या' नाटकाने केली केरळला मदत!

‘या’ नाटकाने केली केरळला मदत!

Subscribe

केरळ राज्यात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर राज्याच नुकसान झालं. केरळच्या लोकांना खरी गरज आहे ती मदतीची. यासाठी सगळेचजण आपापल्यापरीने मदत करत आहेत. यात अमर फोटो स्डुडिओच्या नाटकांतील कलाकारांनी पुढाकार घेतला आहे.

केरळमध्ये महापूर आला आणि सगळीकडे हाहाकार माजला. सगळीकडे आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळचं जनजीवन विस्कळीत झालं. देशातील इतर राज्यांनी, लोकांनी आपापल्यापरीने केरळला मदत केली. कोणी पैसे देऊ केले तर कोणी अन्न, औषधांचा पुरवठा केला. यात सर्वसामान्य लोकं असतील, नेते मंडळी असतील ते अगदी कलाकार या सगळ्यांनीच भरभरून केरळला मदत केली. यातच आता अमर फोटो स्टुडिओच्या मंडळीनीही केरळला मदतीचा हात पुढे केला आहे.

‘कलाकारखाना’ आणि ‘सुबक’ नाट्य संस्थेयला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच ‘अमर फोटो स्टडीओ’ ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील  प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते.

- Advertisement -

‘Chief Minister Relief Fund’ for Kerala योजनेचा आपण हि एक भाग व्हावे आणि त्याचबरोबर ह्या चांगल्या मोहिमेत आपला सहभाग असावा म्हणून ह्या दोन प्रयोगांच्या उत्पन्नात थोडी भर घालून एक लाख एक हजार एक रुपयांची आर्थिक मदत योजनेसाठी मुख्यमंत्री यांना देऊ केली. यावेळी अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे निर्माते सुनील बर्वे आणि अभिनेता अमेय वाघ उपस्थित होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -