घरमनोरंजन'द फॅमिली मॅन' २ चा टीझर प्रदर्शित, 'ही' तमीळ अभिनेत्री करणार डेब्यू!

‘द फॅमिली मॅन’ २ चा टीझर प्रदर्शित, ‘ही’ तमीळ अभिनेत्री करणार डेब्यू!

Subscribe

दोन महिन्यांपूर्वी अभिनेता मनोज वाजपेयीने डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश घेतला. ‘द फॅमिली मॅन’ या अॅमेझॉन प्राईमवरील वेबसिरीजमधून मनोज वाजपेयी यांनी वेबसिरीजच्या दुनीयेत प्रवेश केला. या वेबसिरीजला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. या वेबसिरीजची लोकप्रियता पाहता या वेबसिरीजचा दुसरा सिझन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

अर्थात पहिल्या सिझनची लोकप्रियता पाहता दुसऱ्या सीझनमध्ये तीच स्टार कास्ट असणार आहे. पुन्हा एकदा मनोज वाजपेयी आपल्या जून्या श्रीकांत तिवारीच्या भुमिकेत दिसणार आहे. पण आधीच्या भागापेक्षा आणखी दमदार श्रीकांत तिवारी तुम्हाला दिसणार आहे. द फॅमिली मॅनचे निर्माता,लेखक आणि दिग्दर्शक राज निदिमोरू आणि कृष्णा डीके आहेत. मात्र या स्टार कास्टमध्ये आणखी एक नाव अॅड झालं आहे. तमीळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सुपस्टार अभिनेत्री समंथा. समंथा द फॅमिली मॅन २ मधून वेबसिरीजच्या दुनीयेत प्रवेश करत आहे. अद्याप ही वेबसिरीज कधी रिलीज होईल हे गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -

समंथाने इन्स्टाग्रामवर फॅमिली मॅन २ चा टीझर शेअर केला आहे. #TheFamilyMan #TheFamilyMan2 Yasssssssss finallyyyyyyy…. my web series debut with the most kickass show … ?? @rajanddk my heroes ???? Thankyou for giving me a dream role.” असं कॅप्शन तीने दिलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -