‘झुंड’चे शूटींग सुरू; फोटो व्हायरल

झुंड'च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन मराठी चित्रपटात अभिनय करणार आहेत.

Mumbai
फोटो सौजन्य- bollywoodhungama

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. झुंड चित्रपटाच्या शूटिंगसाठी बिग बी नागपूरात दाखल झाल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. मात्र, समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार आता ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. बिग बींनी ट्वीटरवरुन या बातमीला दुजोरा दिला आहे. नागराज मंजुळेनेसुद्धा सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. नागराजने सोशल मीडियावर शूटिंगच्या लाईट्सचा एक फोटो शेअर करत, त्याला ‘लाईट्स ऑन’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरुनच झुंड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, नागराजने शेअर केलेला हा फोटो सध्या फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मराठी प्रेक्षक नागराजला ‘झुंड’साठी भरभरुन शुभेच्छा देत आहेत. ‘झुंड’च्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन मराठी चित्रपटात अभिनय करताना पाहायला मिळणार आहेत. मराठी सिनेसृष्टीत ‘सैराट’, ‘फँड्री’ आणि ‘नाळ’ सारखे दमदार चित्रपट देणाऱ्या नागराजकडून, ‘झुंड’ बाबतच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात काहीच शंका नाही.

 

View this post on Instagram

 

Lights on…

A post shared by Nagraj Manjule (@nagrajpopatraomanjule) on

माझं स्वप्न सत्यात उतरणार…

झुडं चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका निवृत्त क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या वृत्तानुसार पुढील वर्षापर्यंत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. नागराज मंजुळे आचे निर्माते असतील तर भूषण कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करतील. याविषयी एका मुलाखतीमध्ये बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘लहानपणापसून ज्यांचे चित्रपट पाहत आलो ते माझ्या चित्रपटात काम करणार हे माझं भाग्य आहे. मला माझं स्वप्न सत्यात उतरल्याचा भास होतो आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक होतो. मात्र, आता बिग बी यांनी स्वत: झुंड चित्रपटाची घोषणा केल्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असणार याची मला खात्री आहे.’
नागराज मंजुळे निर्मित ‘झुंड’ हा अमिताभ बच्चन यांंचा पहिला चित्रपट असणार आहे. अमिताभ बच्चन ज्यांच्यावर जगभरातील लोक प्रेम करतात, त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतात ते मराठी चित्रपटात काम करणं हे भाग्यच म्हणावं लागेल.

वाचा: ‘बालगंधर्व’ पर्वाचा पुण्यात अस्त

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here