घरमनोरंजन'बीग बी' यांची कन्या श्वेता नंदाचा अभिनयात डेब्यू

‘बीग बी’ यांची कन्या श्वेता नंदाचा अभिनयात डेब्यू

Subscribe

बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. श्वेता लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार असल्याचे आता नक्की झाले आहे. विशेष म्हणजे श्वेता, आपले वडील यांच्यासोबतच छोट्या पडद्यावर दिसणार आहे.

‘हिरो का बेटा, हिरोही बनेगा’ असे लोक अगदी सहज म्हणतात. एखाद्या अभिनेत्याचा वा अभिनेत्रीचा मुलगा अथवा मुलगी, पुढे जाऊन त्याच क्षेत्रातच येणार असा आपला साधारण समज असतो. मात्र इतक्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी असूनही श्वेता गेली अनेक वर्षे चंदेरी दुनियेपासून लांब होती.

- Advertisement -

 

श्वेता साकारणार ‘हा’ रोल !

श्वेता ही अमिताभ यांच्यासोबत कुठल्या सिनेमात वा कुठल्या मालिकेत काम करणार नाहीये. तर बाप-लेकीची ही जोडी आपल्याला एका ‘टीव्हीसी’ अर्थात टेलिव्हीजनवरील जाहिरातीमध्ये दिसणार आहे. ही जाहिरात आहे कल्याण ज्वेलर्सची. या जाहिरातीमधील श्वेता आणि अमिताभ यांचा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यामध्ये दोघांचाही अत्यंत सामान्य पेहराव असलेला लूक पाहायला मिळतो.

- Advertisement -
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

अमिताभ २०१२ पासून कल्याण ज्वेलर्सचे ग्लोबल ब्रँड अँबेसिडर आहेत. याआधी अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनी कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. श्वेता नंदाच्या अभिनयाला प्रेक्षकांची किती पसंती मिळतेय हे येणारी वेळच सांगेल.

 

प्रेक्षक देणार पसंती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -