Mumbai Power Cut: बिग बी ते कंगनापर्यंत अनेकांनी केले ट्विट; कुणाचा सल्ला तर कुणाचा हल्ला

Mumbai Power Cut: बिग बी ते कंगनापर्यंत अनेकांनी केले ट्विट; कुणाचा सल्ला तर कुणाचा हल्ला

सोमवारी सकाळी अचानक मुंबई शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत वीजेच्या अडचणीचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर अनेक सेलिब्रिटींना ट्विट केले आहे. यापैकी अमिताभ बच्चन आणि कंगना रनौतचं ट्विट सध्या व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना सल्ला दिला आहे तर कंगना रनौतने महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, ‘मी डोंगलच्या माध्यमातून संपर्क करू शकत आहे. शांत राहून संयम राखा असे माझे सर्वांना आवाहन आहे.’ तसेच अजून एका ट्विट करून त्यामध्ये लिहिले आहे की, ‘पूर्ण शहरात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी शांत राहा आणि चांगले राहा.’

तर कंगना रनौतने महाराष्ट्र सरकार आणि संजय राऊत यांच्यावरच थेट निशाणा साधला आहे. कंगना कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यासोबत संजय राऊत यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये कुणाला कामरा संजय राऊत यांना मिनी बुलडोजर देताना दिसत आहेत. कंगनाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘मुंबईमध्ये पावरकट, अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार क.क.क….कंगना’


हेही वाचा – रवीना टंडन डिजिटल माध्यमात पदार्पण करणार