घरमनोरंजनअमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज; मंगळवारपासून सेटवर

अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज; मंगळवारपासून सेटवर

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती आता सुधारली असून शुक्रवारी रात्री त्यांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आता ते पुर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत. ते नियमित वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात केलेल्या वैद्यकीय तपासणीत अमिताभ बच्चन पूर्णपणे फिट असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर येताच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी मोठी चिंता सतावत होती. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, ते पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून मंगळवारी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या शूटींगसाठी सेटवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

अमिताभ बच्चन यांचे फक्त २५ टक्के यकृत कार्यरत

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमिताभ बच्चन यांना यकृताचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे मंगळवारी सकाळी दोन वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे त्यांच्यावर उपचार घेत आहेत. १९८२ साली ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्या यकृताला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांचे फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे. त्यावेळी त्यांना ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रुग्णाचे रक्त चढवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना ‘हेपेटाइटिस बी’चा देखील त्रास आहे. त्यावेळी बच्चन यांना वाचवण्यासाठी संपूर्ण देशाने देवाजवळ प्रार्थना केली होती. बच्चन दाखल असलेल्या रुग्णालयाच्या चहुबाजूंनी चाहत्यांनी घेराव घातला होता. अखेर लोकांच्या प्रार्थना सत्कारणी ठरल्या होत्या आणि त्या संकटातून बच्चन बचावले होते. मात्र, तेव्हापासून त्यांचे फक्त २५ टक्के यकृत कार्यरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -