घरमनोरंजनVideo: 'अमिताभ- श्वेता' यांचा निरागस अभिनय

Video: ‘अमिताभ- श्वेता’ यांचा निरागस अभिनय

Subscribe

अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन नंदा, हिने या जाहिरातीच्या निमित्ताने अभिनय क्षेत्रात डेब्यू केला आहे. बिग बींनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन ही जाहिरात शेअर केली आहे.

‘हिरो का बेटा, हिरोही बनेगा’ असे लोक अगदी सहज म्हणतात. एखाद्या अभिनेत्याचा वा अभिनेत्रीचा मुलगा अथवा मुलगी, पुढे जाऊन त्याच क्षेत्रातच येणार असा आपला साधारण समज असतो. मात्र इतक्या दिग्गज अभिनेत्याची मुलगी असूनही श्वेता गेली अनेक वर्षे चंदेरी दुनियेपासून लांब होती. गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता नंदा लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा होती. महानायकाच्या मुलीला पहिल्यांदाच अभिनय करताना पाहण्यासाठी तमाम लोक उत्सुक होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली असून श्वेता नंदाची पहिली-वहिली जाहिरात प्रदर्शित झाली आहे. ‘कल्याण ज्वेलर्स’साठी केलेल्या या जाहिरातीमध्ये श्वेताचा निरागस पण तितकाच दमदार अनुभव पाहायला मिळत आहे. या जाहिरातीमधून तुम्हाला बाप आणि मुलीचं भावूक नातं पाहायला मिळतं. जाहिरातीत अमिताभ यांनी नेहमीप्रमाणेच आपलया अभियाची छाप पाडली आहे. मात्र, सर्वांचं मुख्य आकर्षण ठरली आहे श्वेता नंदा. नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या बिग बींनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन ही जाहिरात शेअर केली आहे.

सध्या सोशल मीडियावर ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अमिताभ आणि श्वेता यांची ‘बाप-लेकीची’ जोडी चांगलीच चर्चेत आहे. जाहिरातीतील श्वेताच्या अभिनायचं सर्व स्तरातून भरभरून कौतुक आहे. याआधी याच जाहिरातीच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकीकडे या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली होती आणि दुसरीकडे ही जाहिरात पाहण्यासाठीची त्यांची उत्सुकताही ताणली गेली होती. अमिताभ २०१२ पासून कल्याण ज्वेलर्सचे ग्लोबल ब्रँड अँबेसिडर आहेत. याआधी अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनी कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. मात्र, आता श्वेताही आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून जाहिरातीमध्ये झळकली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -