घरमनोरंजनबिग बी झाले भावूक; सेटवरील अखेरची पोस्ट

बिग बी झाले भावूक; सेटवरील अखेरची पोस्ट

Subscribe
गेल्या काही दिवसांपासून महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. नागराज मंजुळेच्या या आगामी चित्रपटासाठी बिग बी नागपूर शहर तसंच ग्रामीण भागात शूटिंग करत होते. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या अमिताभ यांनी नुकतेच ‘झुंड’च्या सेटवरील काही फोटोही ट्वीटरवरुन शेअर केले होते. या फोटोंमध्ये ते बैलगाडी आणि एस.टी. बसच्या प्रवासाचा आनंद लुटताना दिसत आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी आणि बिग बींच्या चाहत्यांनी या फोटोंवर शुभेच्छा आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. मात्र, त्यापाठोपाठ
आता अमिताभ यांनी ट्वीटरवरुन एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘झुंड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, त्याविषयी केलेल्या पोस्टमध्ये बिग बींनी लिहीले आहे, की ‘एखादी सुरु केलेली गोष्ट जेव्हा सोडण्याची/ संपवण्याची वेळ येते तेव्हा त्याविषयीच्या भावना या वेगळ्याच असतात’. या पोस्टमध्ये बिग बींनी झुडं टीमच्या संपूर्ण टीमचे आभारही मानले आहेत. झुंड चित्रपटाच्या टीमने अमिताभा बच्चन यांना उचलून धरल्याचं आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे.


दरम्यान, झुंडच्या शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचे शूटिंग सुरु करणार असल्याचं बिग बींनी या पोस्टद्वारे जाहीर केले आहे. करण जोहर प्रॉडक्शनच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर या तिघांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार, ब्रम्हास्त्र हा epic saga असून त्यामध्ये larger than life संकल्पना रेखाटण्यासाठी VFX चा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. २०१९ च्या ख्रिसमसपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होणर असल्याचं निर्माता करण जोहरने जाहीर केलं आहे. दरम्यान, ‘ब्रम्हास्त्र’च्या निमीत्ताने 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -