घरताज्या घडामोडीअमिताभ यांच्या लूकमुळे 'गुलाबो सिताबो' वादात

अमिताभ यांच्या लूकमुळे ‘गुलाबो सिताबो’ वादात

Subscribe

आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. पण या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा लुक चांगलाच व्हायरल झाला. या लूकच्या तयारीसाठी अमिताभ यांना तीन तास लागायचे. पण या लूकमुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. फोटोग्राफर मयंक ऑस्टन सूफी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी अमिताभ यांचा चित्रपटातील फोटो आणि त्यांनी दिल्लीत काढलेला एका वृद्ध व्यक्तीचा फोटो कोलाज करुन शेअर केलाय. या दोन्ही फोटोंच प्रचंड साम्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या फोटोग्राफरनं काढलेल्या एका फोटोवरून अमिताभ यांचा लुक तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

अमिताभ यांचा ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटातील लुक समोर आला तेव्हापासूनच हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लुकमध्ये अमिताभ मोठी दाढी आणि चष्म्यासह एकदम वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. अमिताभ यांच्या या हटके लुकमुळं त्यांच्या भूमिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहात नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. १२ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.बॉलीवूड कलाकार अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांच्या गुलाबो सिताबो चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. लखनौच्या परिसरातील एका ७८ वर्षीय मुस्लिम घरमालकाच्या भूमिकेत अमिताभ बच्चन पाहायला मिळत आहेत. तर आयुषमान खुराना हा त्यांचा भाडेकरू असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आयुषमान खुराना याने चित्रपटाबाबत बोलताना म्हटले होते की, गुलाबो सिताबो सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या सिनेमातून मी सुजित दासोबत पुन्हा एकदा काम करू शकलो. विकी डोनरनंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचा आनंद आहेच. याचबरोबर खूप दिवसांची इच्छा आणि स्वप्नही पूर्ण झालं कारण मी या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. मला आशा आहे की लोकांना आमची केमिस्ट्री नक्की आवडेल.


हे ही वाचा – चित्रपट नाही तर ‘हा’ व्हिडिओ लाँच करून भाईजान देणार ईदी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -