Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर मनोरंजन त्या ट्विटवरून अमिताभ बच्चन यांचा विवेक ऑबेरॉयला चिमटा?

त्या ट्विटवरून अमिताभ बच्चन यांचा विवेक ऑबेरॉयला चिमटा?

विवेक ओबेरॉयने आपल्या वादग्रस्त ट्विटवर माफी मागितल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी विवेकला अप्रत्यक्षपणे चिमटा काढला आहे.

Mumbai
Amitabh Bachchan reaction on vivek oberoi controversial tweet
विवेकच्या ट्विटवर 'बिग बीं'नी घेतली सुनेची बाजू

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या वादग्रस्त ट्विटवर अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्षपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपली अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर त्यांनी सुनेची बाजू घेतल्याचे बोलले जात आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विवेकला अप्रत्यक्षपणे चिमटा काढला आहे. सोशल मीडियावर काहीही शेअर करताना विचार करुन शेअर करा, असा सल्ला अमिताभ बच्चन यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले बिग बी?

सोमवारी संध्याकाळी विवेक ओबेरॉयने वादग्रस्त ट्विट केले होते. त्याने लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचा धागा पकडून ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट त्याने स्वत: तयार केली नव्हती. मात्र, त्याने शेअर करत पोस्ट भारी असल्याचे म्हटले होते. त्याच्या या पोस्टवरुन मोठे वादंग उठले. नेटीझन्सनी त्याला प्रचंड ट्रोल केले. याशिवाय अभिनेत्री सोनम कपूर आणि उर्मिला मातोंडकर यांनी देखील विवेकवर टीका केली. अखेर त्याने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. यावर आता ऐश्वर्या रायचे सासरे अमिताभ बच्चन यांनी नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. ‘सोशल मीडियावर विचार करुन व्यक्त व्हा’, असे अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.

एक्झिट पोलचे निकाल आल्यानंतर सोशल मीडियावर काही मीम व्हायरल झाले होते. यातीलच एक मीम विवेक ओबेरॉयने आपल्या ट्विटरवर शेअर केले होते. त्या मीमला चांगली क्रिएटिव्हीटी असे म्हणत ‘हे आयुष्य आहे’ असेही तो म्हणाला होता. विवेकने ट्विट केल्यानंतर त्याची दखल तात्काळ बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातून घेतली गेली.

vivek oberai viral meme
व्हायरल झालेले मीम

राज्य महिला आयोगाने देखील या ट्विटची गंभीर दखल घेत विवेक ओबेरॉयला नोटीस पाठवली होती. त्यानंतर आज सकाळी विवेकने सदर ट्विट डिलीट करून माफी मागितली. महिलांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, असे देखील त्याने सांगितले आहे.