जेव्हा बिग बी एस.टी. आणि बैलगाडीत बसतात…

'बडे दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का', असे कॅप्शन बिग बी यांनी या फोटोला दिले आहेत.

Mumbai
Amitabh Bachchan rides in bullock cart and bus for Jhund movie

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. नागरज मंजुळेची निर्मिती असेलला झुंड चित्रपट वर्षाअखेरीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात बिगी बी मुख्य भूमिका साकारणार आहेत. दरम्यान, अमिताभ सध्या झुंड चित्रपटाच्या सेटवर खूप छान धमाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सेटवर फुटबॉल खेळतानाचे फोटो शेअर केले होते. त्यापाठोपाठ आता त्यांनी काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बी चक्क बैलगाडी आणि एस.टी. बसची सवारी करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. झुंड चित्रपटाचे शूटिंग सध्या नागपूरजवळच्या काही गावांमध्ये सुरु आहे. याचदरम्यान काही प्रसंगांच्या शूटसाठी अमिताभ यांना बैलगाडीतून आणि एस.टी. बसमधून प्रवास करवा लागला. इतकंच नाही तर त्यांना खाटेवरही झोपावं लागलं. हे सगळे ‘प्रसंग’ आणि ‘प्रवास’ मी खूप एन्जॉय केल्याचं सांगत बिग बींनी याचे काही निवडक फोटो ट्वीटरवरुन शेअर केले आहेत आणि त्यांना ‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का’, असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर बिग बींच्या एस.टी. आणि बैलगाडी वारीला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

————