घरमनोरंजन'ब्लॅक ब्रिफकेस'साठी मनिष पॉलला अमिताभच्या शुभेच्छा!

‘ब्लॅक ब्रिफकेस’साठी मनिष पॉलला अमिताभच्या शुभेच्छा!

Subscribe

मनीष पॉलनं काम केलेल्या या लघुपटामध्ये त्यानं पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

मनिष पॉलनं आपल्या कॉमेडी अंदाजानं आजपर्यंत सर्वच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. त्यानं केलेल्या विविध भूमिका यादेखील कॉमेडी पठडीतल्याच होत्या. मात्र आता मनीष पॉलचा एक वेगळाच अंदाज ‘ब्लॅक ब्रिफकेस’ या लघुपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे. हा लघुपट त्याच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज आहे. मनीष पॉल नेहमीच आपल्या कामात आणि अगदी सोशल मीडियावरही मस्तीच्या अंदाजातच लोकांच्या समोर आला आहे. मात्र आपल्या स्वभावाच्या विरुद्ध मनीष या लघुपटात दिसत आहे. नकारात्मक भूमिका साकारलेल्या मनीषच्या लघुपटाचा ट्रेलर पाहून खुद्द बिग बी यांनी त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘या प्रतिभावंत कलाकाराकडून अनपेक्षित नजराणा..माझ्या खूप शुभेच्छा,’ असं महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्रेलरच्या खाली कॅप्शन देत ट्विट केलं आहे.

- Advertisement -

मनीष पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत

मनीष पॉलनं काम केलेल्या या लघुपटामध्ये त्यानं पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे. मनीषनं न्यूज एजन्सी भाषाला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणं प्रत्येक अभिनेत्याला प्रत्येक भूमिका साकारत आली पाहिजे, असं म्हटलं आहे. एखाद्या पठडीत बांधलेल्या कलाकाराला हा बंध तोडणं कठीण असतं. मात्र मनिषनं हा बंध तोडत एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. हा लघुपट केवळ १५ मिनिटांचा आहे. दरम्यान या चित्रपटातील काम करण्याचा अनुभव आव्हानात्मक आणि वेगळा असल्याचंही मनिषनं सांगितलं आहे. तर, आपण जे काम करू त्यामध्ये मजा येणं आणि समाधान मिळणं गरजेचं आहे, असं मनिषचं म्हणणं आहे. एक अभिनेता म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं आपल्याला आवडत असून लोकांना फक्त मी शो चं निवेदन करतो आणि कॉमेडी करतो इतकंच माहीत आहे. त्यामुळं प्रेक्षकांना आता ‘माझ्यातला वेगळा मी दिसावा’ असं मनिषला वाटत आहे. इतकंच नाही तर या लघुपटान्वये मनिष स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध करण्यासाठी उत्सुक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -