Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन आणि अमृता फडणवीसांच ते गाणं आलंच...

आणि अमृता फडणवीसांच ते गाणं आलंच…

''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शीर्षक आहे.

Related Story

- Advertisement -

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे अखेर प्रदर्शित झाले.  ‘झी म्यूझिक मराठी’च्या आगामी ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी हे नवं गाणं गायलं आहे. ”डाव मांडते भीती”, असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत. अमृता फडणवीस देखील या गाण्याच्या व्हिडिओत दिसून येत आहेत. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडलवर नव्या गाण्याची लिंक ट्विट केली आहे. या नव्या गाण्यावरुन अमृता फडणवीस ट्वीटवर पून्हा चर्चेत येत आहेत.

- Advertisement -

‘अंधार’ या चित्रपटात अभिनेत्री सागरिका घाटगे आणि अभिनेता गुलशन देवये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गायलेले ”डाव मांडते भीती” हे गाणं जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलं आहे.
अमृता फडणवीस याआधी त्यांच्या ‘तिला जगू द्या’, या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यावर अमृता फडणवीसांनी “मी नेहमी ट्रोलर्सचं स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणं थांबवणार नाही. माझं आणखी एक गाणं लवकरच येणार आहे”, असं म्हटलं होतं.  तसेच अमृता फडणवीस यांचं ‘हॅलो’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यांनी अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. अमृता यांचं गाण्याचं प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.

- Advertisement -