मराठी चित्रपटासृष्टीतील आघाडीची आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत आपली स्वत:ची जागा निर्माण केली आहे. अमृताने मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य केलच पण बॉलिवूडमध्ये देखील ती आपला दबदबा निर्माण करतेय. नुकताच अमृताने राझी चित्रपटा काम करून सगळ्यांची वहावा मिळवली. हिंदी चित्रपटसृष्टी, रिअॅलिटी शो आणि वेबसिरीज सारख्या आधुनिक माध्यमांमध्येही अमृता लोकप्रिय आहे. ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’ या हिंदी चित्रपटामध्ये झळकलेली अमृता आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे.
अमृता लवकरच मलंग या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांची मुख्य भुमिका आहे. या कलाकारांबरोबर अमृताही मलंगमध्ये मुख्य भुमिकेत दिसेल.
अमृताने काही दिवसापूर्वीच चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सुरी करत आहेत.
लवकरच अमृता मराठी ‘पॉन्डेचेरी’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, सिध्दार्थ चांदेकरही दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केले आहे.