घरमनोरंजन'पैसे देऊनही असे स्टंट करू शकले नसते'

‘पैसे देऊनही असे स्टंट करू शकले नसते’

Subscribe

आपल्या सौंदर्याने, नृत्याने मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारी. मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये ही जी आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे अशी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. नुकताच अमृताचा चोरीचा मामला आणि मलंग हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. अमृता आता नुकताच सुरू झालेल्या 'खतरो के खिलाडी १०' मध्ये दिसणार आहे. आजपर्यंत कधीही न बघितलेल्या रूपात अमृता सगळ्यांसमोर येईल. अमृताच्या 'खतरो के खिलाडी १०' प्रवासाबद्दल तीच्याशी साधलेला हा खास संवाद

१. या शोसाठी होकार देताना मनात भिती होती का?

– मी या शोचे आधीचे सगळे सीझन बघितले आहेत. प्रत्येक सीझन बघताना आपण तीथे असावं असं वाटायचं. माझा नवराही या शोचा भाग होता. त्यामुळे या शोचा भाग होण्याची खूप इच्छा होती. शोची ऑफर आल्यावर मी पुढच्या मिनीटाला होकार दिला होता. फक्त माझ्या घरच्यांनी थोडा वेळ घेतला. पैसे देऊनही असे स्टंट तुम्ही अनुभवू शकत नाही. प्रत्येक स्टंट करायच्या आधी मनात थोडी भिती वाटायची पण मी गणपती बाप्पाचं नाव घ्यायचे आणि स्टंटला सुरूवात करायचे. पण नेहमी मनात एक आनंद आसायचा माझ्या प्रेक्षकांना मी आता वेगळ्या रूपात दिसणार आहे.

- Advertisement -

२. तुझ्या प्रवासातला कोणता स्टंट सगळ्यात आवडला?

- Advertisement -

– कोणताही स्टंट करताना तो लांबून खूप छान वाटायचा बघायला. पण त्याच्याजवळ गेलं की भीती वाटायला सुरूवात व्हायची. असाच एक स्टंट होता हेलिकॉप्टरचा. २८ सीटर्स हेलिकॉप्टर होतं ते. नेटवरून चढून जाऊन त्या हेलिकॉप्टरवरून उडी मारयची होती. पण हा स्टंट सगळ्यात जास्त माला आवडला. या स्टंटमध्ये धर्मेशने माझी खूप छान साथ दिली.

३. ‘खतरो के खिलाडी १०’मध्ये गेल्यामुळे मनातली कोणती भिती निघून गेली?
– जे मी कधीच आयुष्यात केलं नसतं असे स्टंट मी तिथे केले. सुरूवातीला रडले, ओरडले पण मी माझे स्टंट पूर्ण केले. हळहळू एक एक गोष्टीची भिती मनातून निघून गेली. पण मनात नसलेली भिती एका स्टंटमूळे आता निर्माण झाली. मला आगीची कधीच भिती वाटली नव्हती पण एका स्टंटमुळे हा आगीची भिती मनात बसली आहे.

४. बेल्गेरिया मध्ये स्टंट करताना काय आव्हानं होती?
– नशीबाने आम्ही बेग्लेरियामध्ये शूट करताना थंडी नव्हता. कारण मला थंडी अजिबात सहन होत नाही. आम्ही ४५ डिग्रीमध्ये शूट केलं. बेल्गेरियामध्ये स्टंट करताना जवळपास २००हून अधिक लोक आमच्या मागे असायची. आमची काळजी घेतली जायची. सगळ्यात महत्त्वाचं रोहित शेट्टी आम्हाला खूप प्रोस्ताहन द्यायचे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना मी आवाहन करते.

५.
तुझ्या आगामी प्रोजक्टबद्दल काय सांगशील?
– २०२०ची सुरूवात माझी मराठी चित्रपट ‘चोरीचा मामला’ने झाली. त्यानंतर ‘मलंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच आता लवकरच पाँण्डेचेरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्याचप्रमाणे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांच काम सुरू आहे. लवकरच हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -