‘सोशल मीडिया नको ग बाई!’

Mumbai

‘जजमेंटल है क्या’, ‘प्रस्थानम’ या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री अमायरा दस्तूरला सोशल मिडीयाची खूप भिती वाटते. तशी अमायरा दस्तूर फारशी सोशलमिडीयावर अॅक्टीव्ह ही नसते. पण तरीही आता अमायराला सोशलमिडीयाची भिती वाटत आहे. असं अमायराने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

अमायरा म्हणते, ‘पार्ट्यांमध्ये जाणं आणि त्याच्या विषयी सोशलमिडीयावर टाकणं मला पटत नाही. मात्र काहीजण असं करतात आणि त्यावर व्यक्त झालेले मला आवडत नाही. सोशलमिडीया हे भयावह आहे. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी कसं काय बालू शकतं. या पातळीवर जाऊन एखाद्यावर टीका कणी कसं करू शकतं. हे मला कधीच कळलं नाही. टोलर्स मंडळी इतरांची मत मान्य करू शकत नाहीत.

त्यामुळे सोशलमिडीयावर न आलेलेच चांगले असे मला वाटते. मी एकटी असताना बॅग घेऊन एकटीच बाहेर पडते. फिरायला जाते. मी पण तिथले फोटो सोशलमिडीयावर शेअर करते पण त्या फोटोंना काहीतरी अर्थ असतो. उगाच फोटो शेअर करायला मला आवडत नाही.

अमायरा दस्तूरने इश्क मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. द ट्रिप या वेबसिरीजसाठी तीने स्कूबा ड्रायव्हरचं प्रशिक्षणही घेतलं. या वेबसिरीजचं शूटींग पॉण्डेचरीमध्ये करण्यात आलं आहे.