स्टार प्रवाह प्रस्तुत ‘आनंदयात्री’ संगीत मैफील

बाबूजींचं जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांना अनोखी स्वरांजली देण्यासाठी स्टार प्रवाह या वाहिनीवर 'आनंदयात्री' या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे.

Mumbai
Anandyatri musical concert on star prvah
स्टार प्रवाह प्रस्तुत आनंदयात्री संगीत मैफील

दिग्गजांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा सांगणारा आणि स्वत:चे आणि इतरांचे आयुष्य आनंदाने भरुन टाकणाऱ्या तसेच शब्द सुरांच्या पाऊलखुणांचा वेध घेणारा कार्यक्रम म्हणजे ‘आनंदयात्री’. शब्द सुरांचे जादूगर सुधीर फडके यांच्या गीतांनी ‘आनंदयात्री’या कार्यक्रमांच्या पर्वाची सुरुवात झाली. स्टार प्रवाहच्यावतीने बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे ही अनोखी स्वरांजली बाबूजींना वाहण्यात आली. स्टार प्रवाह प्रस्तुत ‘आनंदयात्री’या कार्यक्रमातून महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी बाबूंजींची गाणी नेमकी कशी जन्माला आली? या गाण्यांच्या निर्मिती मागे काय प्रेरणा होती? याचा लेखाजोगा कार्यक्रमातून घेण्यात आला.

बाबूजींच्या गाण्यांची मैफील

बाबूजींच्या कारकिर्दीला ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की, सुधीर फडके यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या खास उपस्थितीत त्याच्या गीतांनी उजाळा दिला. ‘आनंदयात्री’च्या निमित्ताने या गाण्यांने पून्हा एकदा ताल धरला. श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अशोक पत्की, रवींद्र साठे, सावनी रविंद्र, प्रियांका बर्वे आणि हृषिकेश रानडे यांनी बाबूजींची अजरामर गीतं सादर करत मैफलीत रंग भरले. गिरीजा ओक गोडबोलेने या संगीत मैफलीचे सूत्रसंचालन केले.

आनंदयात्री हा फक्त कार्यक्रम नसून ती एक परंपरा आहे. हीच परंपरा अखंड जोपासण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या दिग्गज कलाकारांना यानिमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. शब्द-सुरांची ही अनोखी मैफल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि घरात जागा बनवेल याची आम्हाला खात्री आहे.’

-सतीश राजवाडे, स्टार प्रवाहाचे कार्यक्रम प्रमुख

‘आनंदयात्री’ सोहळा नुकताच मुंबईमधील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पार पडला आहे. त्यावेळी मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतले कलाकार उपस्थित होते. अजिंक्य देव, अलका कुबल-समीर आठल्ये, निशिगंधा वाड-दिपक देऊळकर, किशोरी शहाणे विज, आदेश-सुचित्रा बांदेकर, सचिन खेडेकर, स्वप्निल जोशी, सुमीत-चिन्मयी राघवन, अवधूत गुप्ते, पुष्कर श्रोत्री, अतुल परचुरे, देवकी पंडित यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसच हिच मैफील प्रेक्षकांना स्टार प्रवाह या वाहिनीवर १० मार्च संध्याकाळी ७ वाजता अनुभवता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here