घरमनोरंजनTandav Web Series: वादानंतर निर्मात्यांनी मागितली माफी

Tandav Web Series: वादानंतर निर्मात्यांनी मागितली माफी

Subscribe

वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो', असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज झालेली तांडव वेबसिरिज रिलिज होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली. तांडव वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याच्या आरोप या वेब सिरिजवर करण्यात आला. भाजप नेत्यांनी या वेब सिरिजच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. आता तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याबाबत जाहिर माफी मागितली आहे. याबाबतचे ट्विट करुन निर्मात्यांनी माफी मागितली. ‘वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’, असे तांडवच्या ऑफिशिअल कास्ट एंड क्रूच्या वतीने सांगण्यात आले आहे. या वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असेही तांडवच्या संपूर्ण टिम कडून सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले तांडवचे निर्माते? 

‘तांडव ही वेब सिरिज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही लक्षात घेत आहोत. या वेब सिरिजमधील एका सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता आम्ही या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत. तांडव ही वेब सिरिज पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.

- Advertisement -

यावर फक्त माफी मागून चालणार नाही. आम्ही एमेझॉनसह सर्वांना तुरूंगात पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे ट्विट भाजपचे आमदार राम कदम यांनी केले आहे.

- Advertisement -

युपी पोलीस चौकशीसाठी मुंबईला रवाना 

तांडव वेब सिरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात सापडली. भाजप नेत्यांकडूवन वेब सिरिजच्या विरोधात हिंदु धर्मियांच्या भावना दुखवल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. लखनऊमध्येही तांडव वेबसिरिजच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती त्यानंतर युपी पोलीस तांडवच्या संपूर्ण टीमची चौकशी करण्यासाठी युपीहून मुंबईला रवाना झाले आहेत. युपी पोलीस तांडवचे डायरेक्टर आणि संपूर्ण स्टारकास्टची चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजप नेते राम कदम यांनी तांडव वेबसिरिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर लखनऊमध्ये वेब सिरिजच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. एमेझॉन प्राईमच्या प्रमुख अपर्णा पुरोहित, तांडवचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकावर ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावना भडकवणे त्याचबरोबर देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात अयोग्य चित्रण या वेब सिरिजमध्ये करण्यात आले असल्याचे त्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

काय आहे तो सीन?

तांडव वेबसिरिजमध्ये (Tandav Webseries) अभिनेता जीशाय अयूब हा नारदाच्या व्यक्तिरेखा असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो की, ‘भगवान काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतयं की आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी. त्यावर जीशान असे म्हणतो की, मग काय करू, बदलू का? त्यावर त्याला नारद म्हणतो की, भगवान तुम्ही खूपच भोळे आहात.


हेही वाचा – Ram Kadam on Tandav : सैफचा तांडव ‘त्या’ सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -