घरमनोरंजनपंतप्रधानांना भेटल्यानंतर अनिल कपूर म्हणाला...

पंतप्रधानांना भेटल्यानंतर अनिल कपूर म्हणाला…

Subscribe

'पंतप्रधान मोदींची भेट ही माझ्यासाठी कायम एक अविस्मरणीय भेट राहील', अशी भावना अनिल कपूरने व्यक्त केली आहे.

बॉलीवूडचा ‘झकास’ अभिनेता अनिल कपूरने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी आणि अनिल कपूर यांच्या भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनिल कपूरनी स्वत:देखील या खास भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडमधील काही कलाकरांची टीम मोदींना भेटण्यासाठी दिल्लीमध्ये गेली होती. त्यामध्ये बॉलीवूड स्टार्स, निर्माते, दिग्दर्शक आदींचा समावेश होता. त्यापाठोपाठ अनिल कपूर यांनीही मोदींची भेट घेतल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते पण ‘एके’ने मोदींची भेट घेण्यामागे नक्की काय उद्देश होता? याचं कारण आतापर्यंत स्पष्ट झालं नव्हते. मात्र, नुकताच अनिल कपूरने या भेटीमागील कारणाचा खुलासा केला आहे. सोबतच यावेशळेची अनुभवही शेअर केला आहे. आगामी चित्रपट ‘टोटल धमाल‘चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. याच कार्यक्रमादरम्यान अनिल कपूरने आपल्या ‘मोदी भेटीचे’ अनुभव सांगितले.

त्या विशेष भेटीबद्दल बोलताना अनिल कपूर म्हणाला, की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणं ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी संधी होती. या भेटीचे क्षण खरंच खूप अप्रतिम होते. मागील अनेक वर्षांपासून मला मोदींना भेटण्याची इच्छा होती. खरंतर मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळीच मला त्यांना भेटायचं होतं पण कधी योग आला नाही. यावेळी योग जुळून आला. काही भेटी या नशिबाने ठरवलेल्या असतात त्याचवेळी होतात, ही भेट त्यातीलच एक आहे.’ दरम्याम, या भेटीदरम्यान ‘भारतीय चित्रपटसृष्टीविषयी, चित्रपटांविषयी आमच्यात बराचवेळ चर्चा झाली’, असा खुलासा अनिल कपूरने केला. ‘पंतप्रधान मोदींची भेट ही माझ्यासाठी कायम एक अविस्मरणीय भेट राहील’, अशी भावना अनिल कपूरने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -