घरमनोरंजनअंकिता मिलींदला लाडाने काय म्हणते माहितेय!

अंकिता मिलींदला लाडाने काय म्हणते माहितेय!

Subscribe

या व्हीडीओत त्या दोघांची पुन्हा एकदा सुंदर केमिस्ट्री बघायला मिळत आहे. मिलींद आणि अंकिताच्या वयात २६ वर्षांच अंतर आहे.

बॉलिवूडमधील एक कपल त्यांच्या फोटोमुळे आणि वयातील अंतारामुळे कायम चर्चेत असतं. हे दोघे म्हणजे अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार. मिलींद सोमणने त्याच्यापेक्षा तब्बल २६ वर्षांनी लहान असणाऱ्या अंकिता कोनवारशी २०१७ साली लग्न केलं. यावेळी या दोघांच लग्न खूप गाजलं. पण या दोघांनी कधीच कोणीची फिकीर नाही केली. पण नुकतेच मिलिंद सोमणने नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे.

एक कंपनीच्या जाहीरातीसाठी मिलींद आणि अंकिताने एक व्हीडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता आणि मिलिंदने त्यांच्यावर करण्यात आलेल्या कमेंट वाचल्या आहेत आणि त्याला उत्तरही दिली आहेत. एका कमेंटमध्ये अंकिताने मिलिंदला पापाजी आवाज द्यावा असे लिहिले होते. ही कमेंट वाचल्यावर हे दोघेही हासायला लागले. या वर मिलींदने मजेशीर उत्तर दिले. कधी कधी अंकिता मला पापजी असाही आवाज देते. असं मिलींद म्हणाला.

- Advertisement -

यावेळी मिलींद -अंकिताच्या लग्नाबद्दल, त्यांच्या वयातील अंतराबद्ददल, प्रेमाबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले. यावर मिलींद- अंकितानी खूप छान उत्तरे दिली. ‘आमच्या दोघांच्या वयात फार अंतर आहे. जवळजवळ २६ वर्षे. माझी आई आणि माझ्यामध्येही इतकेच अंतर आहे. वय हा केवळ एक आकडा आहे’ ‘समाजात प्रेमावर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. ही बंधने धर्म, वंश, देश, लिंग, वयाचे अंतर या गोष्टींमुळे लादण्यात आली आहेत. पण मला असे वाटते का समाजात अशी बंधने नसावीत. लोकांना प्रेम करण्याची आणि स्वत:चा जोडीदार शोधण्याचे स्वातंत्र असायला हवे असे मला वाटते. लोकांनी समाजाचा विचार करण्यापेक्षा स्वत:च्या भावना आणि मनाचे ऐकून निर्णय घ्यावेत’ असे मिलिंद म्हणाला आहे.

- Advertisement -

या व्हीडीओत त्या दोघांची पुन्हा एकदा सुंदर केमिस्ट्री बघायला मिळत आहे. काही दिवासांपूर्वी अंकिता- मिलींदचा किलीमांजारो पर्वतावरील किस करतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -