घरताज्या घडामोडीसुशांतसिंहची केस सीबीआयकडे; एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, 'अखेर तो क्षण आला'

सुशांतसिंहची केस सीबीआयकडे; एक्स गर्लफ्रेंड अंकिता म्हणाली, ‘अखेर तो क्षण आला’

Subscribe

याबाबत अंकिता लोखंडने दोन्ही हात जोडून आभार मानले आहेत.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण (Sushant Singh Rajput Case) सीबीआय (CBI) चौकशीसाठी बिहार सरकारने दिलेल्या शिफारशीला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान ही माहिती देण्यात आली. याबाबत आता सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात बॉलिवूड अभिनेत सुशांत सिंह राजपूत यांची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने ट्विट केले आहे आणि आभार मानले आहेत. अनेक दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची (CBI Probe) मागणी केली जात होती. अखेर आज ही मागणी पूर्ण झाली आहे.

दरम्यान केंद्राने सुशांतसिंह प्रकरणाबाबत सीबीआय चौकशीला मान्यता दिल्याबद्दल अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)ने ट्विटमध्ये म्हणाले की, ‘ज्या क्षणाची आम्ही वाटत पाहत होतो, अखेर तो क्षण आलाच.’ याबाबत तिने दोन्ही हात जोडून आभार मानले आहेत.

- Advertisement -

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकारने सोमवारी केंद्र सरकारकडे शिफारस पाठविली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यादरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतादेखील केंद्राच्या वतीने न्यायालयात उपस्थित होते. एसजी म्हणाले की, ‘बिहारच्या सीबीआय चौकशीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली असून हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले आहे.’

- Advertisement -

हेही वाचा – Sushant Sucide Case : बिहार पोलिसांची फाईल तयार; मोठे मासे अडकण्याची शक्यता


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -