Sushant singh rajput case: रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडे म्हणाली…

अशी म्हणाली अंकिता...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्जच्या संबंधात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने सलग तिसर्‍या दिवशी अभिनेत्रीची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियाला अटक केल्यानंतर अभिनेता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अंकिता लोखंडे हिने असे ट्वीट केले की, “नशीब आणि योगायोगाने काहीही घडत नाही.” आपण आपल्या कृतीतून आपले भविष्य घडवित असतो. ”

सुशांतच्या बहिणीनेही मानले देवाचे आभार

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियाला अटक केल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  रियाच्या अटकेनंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने एक पोस्ट शेअर करून एक मोठा विजय झाला असल्याचे म्हटले आहे.

तिने ट्विट करून तिची पहिली प्रतिक्रिया देताना #GodIsWithUs असे म्हटले आहे. अर्थात ‘देव आमच्या बरोबर आहे’ असे लिहून तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या भावासाठी न्यायाच्या मार्गावर असलेली श्वेता सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती आणि सुशांतला न्याय मिळावा या क्षणाची वाट पाहत होती. सुशांतच्या कुटूंबासह जगभरातील लोकांनीही सुशांतला न्याय मिळावा म्हणून या लढाईत सहभाग घेतला होता.

दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणासंदर्भात रिया चक्रवर्तीला न्यायालयात हजर केले जाणार असून अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27 (अ) हे अजामीनपात्र कलम लावण्यात आल्याने रियाला NCB कोठडी संपल्यावर लवकरात लवकर जामीन मिळणार नाही, असा हा कायदा सांगतो. त्यामुळे रियाला पुढील काही दिवस NCB कोठडीत आणि नंतर जेलमध्ये काढावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.


Sushant singh rajput case: रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीने दिली पहिली प्रतिक्रिया